पुणे / राजेंद्रकुमार शेळके : पुणे जिल्हा व विभागातील डी फार्मसी विद्यार्थ्यांसाठी नॅशनल फार्मसी वेल्फेअर असोसिएशन पुणे यांच्या पुढाकाराने तसेच तंत्र शिक्षण संचालनालय, मुंबई, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई, केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन महाराष्ट्र व महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने मेगा जॉब फेअर चे आयोजन करण्यात आले आहे. Megha Job Fair
सदर मेगा जॉब फेअर (Job Fair) २७ एप्रिल २०२४ रोजी स. १० वाजता महालक्ष्मी लॉन्स राजाराम पूल, कर्वेनगर, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. जवळपास ५० फार्मास्युटिकल कंपन्यांचा सहभाग यामध्ये आहे. एकूण ३० ते ३५ औषधनिर्माण शास्त्र पदविका महाविद्यालये आणि २००० पेक्षा जास्त विद्यार्थी यामध्ये सहभागी होणार आहेत.
एका छताखाली इतक्या मोठ्या संख्येने रोजगार संधी उपलब्ध करून देण्याचा फार्मसी क्षेत्रातील हा देशातील पहिलाच उपक्रम आहे. औषध निर्माणशास्त्र क्षेत्रात असंख्य करिअरच्या संधी उपलब्ध असून गरजू व हुशार विद्यार्थ्यांना रोजगार तसेच इच्छुक कंपन्यांना योग्य व सक्षम विद्यार्थी निवड करता यावी यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
सदर कार्यक्रमांतर्गत डिप्लोमा फार्मसी मधील विद्यार्थ्यांना फार्मा प्रोडक्शन, क्वालिटी अशूअरंस, सेल्स मार्केटिंग, डाटा मॅनेजमेंट मेडिकल कोडिंग, फार्माकोविजीलन्स, साखळी मेडिकल स्टोअर कंपनी, हॉस्पिटल फार्मसी, इन्शुरन्स कंपनी इ. क्षेत्रात कंपनी प्रतिनिधीच्या उपस्थिती रोजगार उपलब्ध असणार आहेत.
रोजगार इच्छूक विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन नॅशनल फार्मसी वेल्फेअर असोसिएशन यांच्याकडून करण्यात आलेले आहे.
विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करिता खालील लिंक वर नोंदणी करणे अनिवार्य आहे. https://forms.gle/Y1zpqNKkQmtz8Fyh7
तसेच अधिक माहितीसाठी
९५९५३५७०७०/ ९९२२३८४४४७ या क्रमांकावर संपर्क करू शकता.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’
हे ही वाचा :
Railway : रेल्वे मध्ये 1113 जागांसाठी भरती; पात्रता 10वी, ITI
Sainik School : सैनिक स्कूल, सातारा अंतर्गत विविध पदांसाठी भरती
NCB : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अंतर्गत भरती
पुणे येथे AIASL अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती
Mahavitaran : महावितरण अंतर्गत 468 पदांसाठी भरती
IIM : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, मुंबई अंतर्गत भरती
IFSCA : आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण अंतर्गत भरती
SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या 968 जागांसाठी भरती
IGI एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत 1074 पदांसाठी भरती
NABARD : नाबार्ड अंतर्गत रिक्त पदांची भरती, आजच करा अर्ज!
Job Fair : विद्यार्थ्यांकरिता मेगा जॉब फेअर चे आयोजन; आजच करा नोंदणी !
Nagpur : विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर अंतर्गत भरती
DRDO – ACEM, नाशिक अंतर्गत विविध पदांसाठी भरती; आजच करा अर्ज!
District Court : जिल्हा सत्र न्यायालय अंतर्गत भरती; पात्रता 4थी पास