Sunday, December 22, 2024
Homeजिल्हाबिरसा क्रांती दल नाशिक विभागीय अध्यक्ष पदी रोहित पावरा यांची निवड !

बिरसा क्रांती दल नाशिक विभागीय अध्यक्ष पदी रोहित पावरा यांची निवड !

नाशिक : बिरसा क्रांती दल नाशिक विभागीय अध्यक्ष पदी रोहित पावरा यांची निवड करण्यात आली आहे. बिरसा क्रांती दल संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष दशरथ मडावी यांच्या सुचनेनुसार आॅनलाईन करण्यात आली .

बिरसा क्रांती दलाच्या झेंड्याखाली आदिवासी समाजातील ४५ जमातीतील परिवर्तनशील युवक जागरूक शिक्षित कर्मचारी यांना संघटीत करण्याचा निर्णय बिरसा क्रांती दलाने घेतला आहे. समाजातील अशा घटकांना संघटीत करण्याची धारणा स्वावलंबना स्विकार ही सर्व श्रेष्ठ गोष्ट असते. 

आदिवासी विद्यार्थ्यांना संशोधन फेलोशिप देण्याची मागणी, सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप

समाज्याच्या सर्वांगिण विकासासाठी प्रगतीसाठी आत्मसन्मानासाठी अस्तित्व व संस्कृती संवर्धनासाठी एका वैचारिक व कॅडरबेस संघटनेची आवश्यकता होती ही आदिवासी समाजाची गरज लक्षात घेऊन बिरसा क्रांती दल या कॅडरबेस संघटनेची निर्मिती झाली आहे.

यावेळी उपस्थित बिरसा क्रांती दल संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रंगराव काळे, राज्य उपाध्यक्ष डी. बी. अंबुरे, राज्य सचिव चिंधू आढळ महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विजय आढारी, राज्य महिला फोरम अध्यक्षा गिरिजा उईके, नाशिक जिल्हा अध्यक्ष एकनाथ गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष अशोक जाधव, जिल्हा उपाध्यक्ष भगवान देशमुख, मधुकर पाडवी, जिल्हा महासचिव किशोर माळी, सचिव बाळू कचरे, नंदूरबार जिल्हा अध्यक्ष शिलेदार पावरा, दिंडोरी तालुका उपाध्यक्ष शंकर वासले, पुंडलिक वाघेरे, नाशिक तालुका अध्यक्ष हभप पुंडलिक पिंपळके, नांदगाव तालुका अध्यक्ष हिरालाल देशमुख, इत्यादी बिरसा क्रांती दल संघटनेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

बिग ब्रेकिंग : ‘तिने’ रचला इतिहास, ‘झाली सर्वात तरूण आदिवासी उपमहापौर’

आदिवासी संस्थेला डॉ. गोविंद गारे यांचे नाव देण्यात यावे – मधुकर पिचड

जिल्हा न्यायालय अकोला येथे भरती, दहावी उत्तीर्णांसाठी संधी !

संबंधित लेख

लोकप्रिय