Friday, November 22, 2024
Homeजिल्हाNashik : वैचारिक सक्षम पिढी घडविण्यासाठी विचार जागर स्पर्धा उपक्रमाची आवश्यकता –...

Nashik : वैचारिक सक्षम पिढी घडविण्यासाठी विचार जागर स्पर्धा उपक्रमाची आवश्यकता – कॉम्रेड राजू देसले

Nashik : शालेय शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांला महापुरुषांच्या विचारांची ओळख करून देणे हे प्रत्येक पालक व शिक्षकांचे आद्यकर्तव्यच आहे. महापुरुषांच्या जिवनातून विद्यार्थांच्या जिवनाला दिशा मिळते. वैचारिक सक्षम पिढी घडविण्यासाठी विचार जागर स्पर्धा उपक्रमाची आवश्यता आहे, डॉ बाबासाहेब आंबेडकर यावर्षीच्या जयंती निमित्ताने सर्व पुरोगामी, परिवर्तनवादी, संविधान प्रेमी, फुले शाहू आंबेडकर, मार्क्सवादी, शेतकरी कामगार चळवळीतील कार्यकर्ते, नेत्यांनी संकल्प करू या हजारो विद्यार्थी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार जागर स्पर्धेत सहभागी होतील असा प्रयत्न करू या असे प्रतिपादन कॉम्रेड राजू देसले यांनी आयटक कामगार केंद्र नाशिक येथे केले. Nashik news

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने इलाईट सर्टिफॅशन्स अँड इनोवेटिव्ह सोल्युशन्सच्या वतीने इयत्ता ७ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार जागर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाची माहिती विद्यार्थी, शिक्षक व पालकांना व्हावी यासाठी जनजागृती अभियान सर्वत्र जोरदार सुरु आहे. याचाच एक भाग म्हणून सि.बी.एस येथील आयटकच्या जिल्हा कार्यालयात उपक्रमाच्या अनुषंगाने पुरोगामी विचारवंताची आढावा नियोजन बैठक नुकतीच संपन्न झाली.

याप्रसंगी आबासाहेब थोरात, महादेव खुडे,जयवंत खडताळे, निशिकांत पगारे, अजमल खान, पदमाकर इंगळे, तल्हा एस.जी. आदी. मान्यवर यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यावेळी ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्र म्हणजे महापुरुषांच्या विचाररत्नाची खाण आहे. महापुरुषांच्या त्यागातून, वैचारिक संपन्ननेतुन व सम्यक दृष्टीतुन आजचा गौरवशाली महाराष्ट्र घडला आहे. या महापुरुषांच्या जिवन चारित्र्याची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी यासाठी नाशिक जिल्ह्यात प्रथमच महापुरुषांच्या जिवनावर आधारित विचार जागर स्पर्धा परीक्षा हा शैक्षणिक उपक्रम सुरु करून सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब थोरात यांनी वैचारिक विचारांची पिढी घडविण्याचा ध्यास घेतला आहे.

सदर उपक्रमाबद्दलची सविस्तर माहिती आबासाहेब थोरात यांनी उपस्थितांना देवून राजश्री शाहू महाराज, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांच्या जिवनावर आधारित स्पर्धा परीक्षा यशस्वीरित्या पूर्ण करून आता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित स्पर्धा परीक्षा आयोजित केल्याची माहिती दिली.

या परीक्षेची नावनोंदणीची अंतिम तारीख २० एप्रिल असल्याने जिल्हातील ज्यास्तीत ज्यास्त विद्यार्थ्यांनी या परीक्षेमध्ये सहभाग घेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभ्यास करून मानवंदना द्यावी असे आवाहन केले.

मिटिंगचे प्रास्ताविक मिलिंद बनसोडे यांनी केले तर दिपक अचलखांब यांनी आभारप्रदर्शन केले. या बैठकीला पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते निवृत्ती कसबे, प्राजक्ता, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

अभिनेता गोविंदा यांचा राजकारणात प्रवेश, ‘या’ पक्षात केला प्रवेश

मोठी बातमी : दिलीप वळसे पाटील यांचा अपघात, खुब्याला मार तर हाथ फ्रॅक्चर

तुम्ही तर पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं प्रकाश आंबेडकर यांचा संजय राऊतांवर घणाघात

शिवनेरीवर कोल्हे आणि आढळराव आमने – सामने, भेटीचा व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल !

मोठी बातमी : खासदार नवनीत राणा यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश

मोठी बातमी : वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीला मोठा धक्का, वंचितने जाहीर केले आपले उमेदवार

संबंधित लेख

लोकप्रिय