पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : इन्स्टिट्यूट फॉर सोशल रीफॉर्मस अँड हाय एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये भारत सन्मान निधी पुरस्कार डॉ.राजू पांचाळ यांना प्रदान करण्यात आला. डॉ. राजू पांचाळ यांची पत्नी डॉ.जागृती पांचाळ, कन्या इच्छा पांचाळ यांनी स्वीकारला. pcmc news
नवी दिल्ली विधानसभा या ठिकाणी संपन्न संपन्न झालेल्या या कार्यक्रमास दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष रामनिवास गोयल, सचिव राजकुमार अग्रवाल, आयएसआरएचइ चे अध्यक्ष डॉ.अतुल कुमार शर्मा, सचिव रेणू गुप्ता, रामनिवास गोयल आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
डॉ.राजू पांचाळ हे गेली १५ वर्षापासून ताथवडे येथील राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. या व्यतिरिक्त त्यांनी दीडशेहून अधिक शाळा महाविद्यालयातील चाळीस हजारहून अधिक विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास का? व कसा करावा? स्वतः विकसित केलेल्या विषयावर ते मार्गदर्शन करीत आहे.
या कार्याचा गौरव म्हणून दिल्ली येथे त्यांना भारत सन्मान निधी पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. या पुरस्कार प्राप्तीबद्दल राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत, राजर्षी शाहू इंजीनियरिंग कॉलेजचे संचालक डॉ. राकेश जैन, उपसंचालक डॉ.अविनाश देवस्थळी, ताथवडे शैक्षणिक संकुलाचे संचालक प्रा सुधीर भिलारे, रवी सावंत यांनी अभिनंदन केले. PCMC
![whatsapp link](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/03/whatsapp.gif)
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/03/google-news-GIF.gif)
हे ही वाचा :
ब्रेकिंग : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात महत्वाची घडामोड
बाबा रामदेव यांना झटका; सर्वोच्च न्यायालयाची अवमान नोटीस
Police Bharti : पोलीस भरती प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता !
Pune : कांद्याच्या दरात घसरण; शेतकरी हवालदिल
मोठी बातमी : सर्वोच्च न्यायालयाने स्टेट बँकेला पुन्हा धरले धारेवर
अजमेर मध्ये रेल्वेचा भीषण अपघात, ४ डबे रुळावरून घसरले रुळही उखडले