Sunday, March 16, 2025

Alandi : आळंदी नगरपरिषदेची दिव्यांगांना मदत ; 125 जणांना प्रत्येकी 5 हजार रुपये वितरित

आळंदी (अर्जुन मेदनकर) – येथील आळंदी नगरपरिषदे मार्फत शहरातील 125 पात्र दिव्यांग लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर प्रत्येकी 5000 प्रमाणे एकूण 6.25 लक्ष इतका निधी वितरित करण्यात आला असल्याची माहिती आळंदी नगरपरिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री कैलास केंद्रे यांनी दिली. (Alandi)

केंद्र शासनाच्या नि:समर्थ (दिव्यांग) व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ मधील कलम ३७(ब) मधील तरतुदींच्या अनुषंगाने राज्यातील नगरपरिषद क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींसाठी किमान ५% निधी राखीव ठेवण्यात येतो. या निधीतून शहरातील पात्र दिव्यांगांना कृत्रिम अवयव देणे, आर्थिक सहाय्य करणे अश्या विविध प्रकारे मदत करून त्यांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न केले जातात. दिव्यांगांना औषधोपचार किंवा त्यांच्या इतर दैनंदिन गरजा भागविणे शक्य व्हावे म्हणून आळंदी नगरपरिषद मार्फत 125 दीव्यांगांच्या खात्यावर प्रत्येक 5000 रुपये थेट बँक खात्यावर पाठविण्यात आले.

दिव्यांगांच्या बँक खात्यावर निधी वितरण करण्यात मुख्याधिकारी केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेच्या विष्णु कुमार शिवशरण,वैशाली पाटील,अरुण घोडे या अधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले. (Alandi)

आळंदी नगरपरिषद मार्फत दरवर्षी शहरातील पात्र दिव्यांग बांधवांना आर्थिक सहाय्य केले जाते तसेच त्या सर्वांचा 4 लाखांचा विमा देखील नगरपरिषद मार्फत उतरविण्यात आला असून दरवर्षी या विम्याचे प्रीमियम नगरपरिषद मार्फत भरला जात असल्याचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी सांगितले.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles