Thursday, December 12, 2024
Homeराष्ट्रीय'एसएफआय'ची महिलांवरील वाढत्या अत्याचाराविरोधात देशभरात निदर्शने

‘एसएफआय’ची महिलांवरील वाढत्या अत्याचाराविरोधात देशभरात निदर्शने

(प्रतिनिधी) :- देशातील महिलांवर वाढत्या अत्याचाराविरोधात, वर्षोनवर्षो चालत आलेल्या बलात्कार संस्कृती (रेप कल्चर)चा विरोधात स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) या विद्यार्थी संघटनेने आज 6 जुलै रोजी देशभरात निदर्शने करत निषेध केला.

विद्यार्थ्यांनी हातात पोस्टर घेऊन विविध मागण्या, घोषणा त्यावर लिहून हे आंदोलन केले गेले. बहुतांश ठिकाणी हे आंदोलन घरात राहून केले गेले. जिथे परवानगी मिळाली तिथे शारिरीक अंतर ठेवून निदर्शने ही करण्यात आली

एसएफआयच्या अखिल भारतीय सहसचिव दिप्सिता धर यांनी ट्विटरवर या आंदोलनाची पोस्ट केली करत निषेध व्यक्त केला आहे.

मुळात पुरुषी व विकृत मानसिकता बदलणे आवश्यक आहे. भारत हे महिलांसाठी एक धोकादायक ठिकाण ठरत आहे. इथल्या विकृत पुरुषांनी ८ महिन्यांच्या बालिकेपासून ते १०० वर्षाच्या महिलांवर ही बलात्कार केला आहे. थोर संस्कृती असलेल्या भारतात बलात्कार संस्कृती बनत आहे ज्यात मुलींना कशा प्रकारचे कपडे परिधान करावे, कसे वागावे, घरात केव्हा यावे हे सुध्दा सांगितलं जाते. चालता बोलता महिलांच्या चारित्राकडे पाहून वेडेवाकडे  बोलले जाते. भारत सरकारने महिलांवरील कायदे सक्षम करून त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याची मागणी केली असल्याचे ‘एसएफआय’च्या केंद्रीय कमिटी सदस्य कविता वरे यांनी सांगितले.

एसएफआय’चे हे आंदोलन महाराष्ट्रासह देशभरातील वेगवेगळ्या राज्यात पार पडले. महाराष्ट्रातील ठाणे पालघर, औरंगाबाद, बीड, जालना, नागपूर, उस्मानाबाद आदीसह जिल्ह्यात प्रतिसाद मिळाल्याचे राज्य सरचिटणीस रोहिदास जाधव यांनी म्हटले आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय