ही सोबतीची साथ
ही सोबतीची साथ
वाटते हवीहवीशी….
देऊनी हातात हात
मैत्री हवीहवीशी…
अशी ही निखळ मैत्री आपुली
बहरावी कमलपुष्पासारखी
ही फुललेली मैत्री
देते वेगळाच आनंद
निर्मिते वेगळे भावविश्व
या विश्वात नसावी कोणतीच बंधने
ना अपेक्षा
केवळ हवा विश्र्वास आणि
मोकळा श्र्वास
मुक्त अशा या विश्वात
खूप सारे बोलू आपण
जाणूनी एकमेकांचे स्वभाव
ही मैत्री करू अधिक दृढ
भांडलो जरी कधी
तरी येऊ पुन्हा एकत्र
मुक्त अशा या विश्वात
असाव्या अशा आठवणी
ज्या केवळ आपणच जाणू
ज्या आठवताच येईल
गालावर खुदकन हसू
तरीही वाटते
ही साथ असावी आयुष्यभर
सुखदुःखाच्या क्षणात
असावे नेहमी तू सोबत
जिंकू हे जग सारे
जर तू असशील सदैव सोबत
अपेक्षा बेलवलकर, सांगली
abelvalkar56@gmail.com