Thursday, December 12, 2024
Homeराजकारणकाही न करता श्रेय लाटण्याची संघाची प्रवृत्ती; कॉग्रेसचे सचिन सावंत यांची टिका.

काही न करता श्रेय लाटण्याची संघाची प्रवृत्ती; कॉग्रेसचे सचिन सावंत यांची टिका.

काही न करता श्रेय लाटण्याची संघाची प्रवृत्ती; कॉग्रेसचे सचिन सावंत यांची टिका. T

(प्रतिनिधी) :-  काही न करता श्रेय लाटण्याची प्रवृत्तीला संघप्रवृत्ती म्हणतात. कोरोना झालेल्या संघाच्या कार्यकर्त्यांच्या अंतिम संस्कारापासून पळ काढणारे संघाचे लोक धारावीचे श्रेय घेतात. तेव्हा त्यांनी नागपूरचा संघाचा रेशीमबाग परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित का झाला? यांचे उत्तर द्यावे, अशी टिका काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी केली आहे.

     मुंबईतल्या धारावीमध्ये कोरोना विरुद्ध काम करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घराघरांमध्ये जाऊन स्क्रिनिंग केले आहे. त्यामुळे केवळ सरकारने याचं श्रेय घेऊ नये, असे चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमध्ये म्हटले होते.

     संघाचे मुख्यालय असलेल्या रेशीमबागेत कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने रेशीमबाग परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. यानंतर काँग्रेस नेते सावंत यांनी हि टिका केली आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय