(जयपूर) :- सचिन पायलट यांच्या बंडामुळे राजस्थानच्या काँग्रेस मध्ये फुट पडली आहे. तसेच पायलट यांच्या बंडामुळे सरकार समोर नवीन आव्हान उभे झाले असताना काँग्रेसचे नेते रणदीप सिंह सूरजेवाला यांनी सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रीपदावरुन हटवण्यात आल्याची माहिती दिली. हा निर्णय आज काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडली त्यात घेण्यात आला. त्या बैठकीला १०२ आमदार उपस्थित होते.
सत्य को परेशान किया जा सकता है पराजित नहीं।
— Sachin Pilot (@SachinPilot) July 14, 2020
सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रीपदावरुन हटविल्या नंतर सचिन पायलट यांनी म्हंटले आहे की, “सत्य को परेशान किया जा सकता है पराजित नहीं”. या ट्विट वर काँग्रेस काही प्रतिक्रिया देणार कि नाही यावर अनेकांचे लक्ष लागले आहे.