Thursday, December 12, 2024
HomeNewsजुलै- 14: देश-विदेशातील आजच्या महत्वाच्या टॉप 10 घडामोडी वाचा एका क्लीक वर

जुलै- 14: देश-विदेशातील आजच्या महत्वाच्या टॉप 10 घडामोडी वाचा एका क्लीक वर

देश विदेश

१) नाईल नदीवरती होणाऱ्या धरण बांधकामाबाबत ईजिप्त, इथिओपिया आणि सुडानमध्ये कोणता करार होऊ शकला नाही


कैरो, इजिप्त: आफ्रिकेतील काही देशांसाठी महत्त्वाची असणाऱ्या नाईल नदीवरती इथिओपियाकडून बांधल्या जाणाऱ्या धरणाबाबत होणारी चर्चा शेवटी कोणत्याही निर्णयावर न येता थांबली.

२)अमेरिकेमध्ये जगातील सर्वाधिक मोठा कोविड-१९ च्या चाचणीचा उपक्रम चालू आहे: राष्ट्राध्यक्ष ट्रम्प


वॉशिग्टन, अमेरिका: जगातिक सर्वाधिक कोरोना बाधित असलेल्या अमेरिकेत कोरोनाच्या सर्वाधिक चाचण्या झाल्या आहेत. त्यामुळे येणारी संख्याही मोठी आहे. त्यामुळे होणारे प्रशासकिय काम मोठे असून तो एक उपक्रमच आहे असे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सांगितले.

३) नेपाळचे पंतप्रधान ओली यांनी भगवान राम नेपाळी होता आणि खरी अयोध्या नेपाळमध्ये आहे असा दावा केला


काठमांडू, नेपाळ: पंतप्रधान ओली यांनी खरी अयोध्या नेपाळमध्ये आहे आज भगवान राम नेपाळी होता असा दावा करून अयोध्या बिरगुंज प्रांतातील थोरी येथे आहे असे ही सांगितले.

४) अमेरिकेतील १७ राज्यांच्या प्रमुखानी नवीन विद्यार्थी व्हिसाच्या नियमाविरूद्ध कोर्टात धाव घेतली


वॉशिग्टन, अमेरिका: अमेरिकेच्या १७ राज्यांच्या प्रमुखांनी परदेशी विद्यार्थ्यांवर लादलेल्या नवीन शिक्षण नियमाविरुध्द कोर्टात धाव घेतली असून राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या सरकारने अर्थ नसलेले कारण देत हा नियम बनवला आहे असे सांगत हा नियम रद्द करण्यासाठी कोर्टात दावा केला.

५) गुगल, फेसबुक, मायक्रोसॉफ्ट आणि अजून काही तंत्रज्ञान कंपन्यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष ट्रम्पने लागू केलेल्या नवीन शिक्षण धोरणाविरूद्ध कोर्टात धाव घेतली


वॉशिग्टन ,अमेरिका: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना आणलेल्या नवीन शिक्षण नियमामूळे परदेशी विद्यार्थ्यांचा व्हिसावर होणारा परिणाम लक्षात घेता मोठमोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांनी कोर्टात धाव घेतली. यामध्ये फेसबुक, मायक्रोसॉफ्ट, गुगलसारख्या नामवंत कंपन्या देखिला आहेत्.

६)अमेरिकेने दक्षिण चीनी समुद्रावरील चीनचा दावा रद्द केला


वॉशिग्टन, अमेरिका: अमेरिकेने स्पष्ट शब्दात दक्षिण चीनी समुद्रावरती चीनचा कोणताही हक्क नसल्याचे सांगितले. चीनकडे तसे सांगण्यासाठी कोणताही पुरावा नाही असेही अमेरिकन सरकारकडून सांगण्यात आले.

७)तालिबानने अफगाणिस्तानमध्ये केलेल्या हल्ल्यात १० लोक मृत्यूमुखी पडले


काबूल, अफगाणिस्तान: अफगाणिस्तानाच्या राष्ट्रिय सुरक्षा विभागाच्या विभागिय कार्यालयाजवळ तालिबानकडून कारमध्ये बॉम्बलावून हल्ला करण्यात आला. त्यामुळे १० लोकांच्या मृत्यू झाला असून मोठ्याप्रमाणात लोक जखमी झाले आहेत.

८) सुदानमधील शस्त्रधारी संघाकडून केलेल्या हल्ल्यामध्ये १३ लोकांचा मृत्यू झाला


सुदान: सुदानमध्ये शस्त्रधारी संघाकडून दरफुरमध्ये हल्ला करण्यात आला त्यामध्ये १३ लोकांचा मृत्यू झाला असून हा हल्ला सरकारशी सलग्न शस्त्राधारी गटांकडून झाला असल्याचे आंदोलनकर्त्यांचे मत आहे.

९) पोलंडमध्ये झालेल्या निवडणूकीमध्ये सत्ताधारी पक्षाने पुन्हा सत्ता मिळवण्यात यश मिळवले


वार्सा, पोलंड: पोलंडमध्ये नुकत्याच राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली. त्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे अंड्रेझ दुदा यांचा विजय झाला. ते ५१% मतांबी निवडून आले तर विरोधीपक्षाला ४९ % मतदान झाले असे पोलंडच्या निवडणूक आयोगाने सांगितले.

१०) कोरोनाबाधितांची कोरोनाविरुद्ध लढण्याची प्रतिकारशक्ती काही दिवसांमध्ये जाऊ शकते


पॅरिस, फ्रान्स: नुकत्याच झालेल्या अभ्यासानुसार उपचार झालेल्या व्यक्तीमध्ये कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी बनलेली प्रतिकारशक्ती ९० दिवसात जाऊ शकते. यानवीन अभ्यासानुसार त्या व्यक्ती पुन्हा बाधित होऊ शकतात असेही सांगितले. त्यामुळे देशादेशातील सरकारांना याकडे ही लक्ष देण्याची गरज भासणार आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय