साथ
तुझं असणं पण नसण्यासारखं नि माझं रडणं पण हासण्यासारखंच
तुझं लांब असणं अगदी जवळ असल्यासारखं.
माझ्यासाठी तू किती पण लांब असलास तरी जवळ असल्यासारखं .
मला तूझ्या दू:खात सहभागी व्हायला आवडेल पण माझ्या दू:खात तूला सहभागी नाही करणार कारण मला कायम तूला आनंदी पाहायला आवडतं.
पण आता मात्र
तू नसतानाही तूझ्या असण्याची इतकी सवय झाली आहे की
तू नसून पण मी वेड्यासारखी तूझ्यासोबतच बोलते नि बोलता बोलता आठवतं या चार भिंतीमध्ये आपण एकटेच आहोत.
चेतना शेटे,घोडेगाव
ता.आंबेगाव जि. पुणे