Monday, December 23, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC:अयोध्येतील श्रीराम मंदीर प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्त शहर मनसेच्या वतीने जल्लोष

PCMC:अयोध्येतील श्रीराम मंदीर प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्त शहर मनसेच्या वतीने जल्लोष

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:महाराष्ट्र नवनिर्माण सेना पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने अयोध्येतील श्रीराम मंदीर प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्त विविध ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना भोसरी विधान सभेच्या वतीने उपशहराध्यक्ष विशाल मानकरी,उपविभाग अध्यक्ष सचिन मिरपगार,शाखाअध्यक्ष विक्रम सोरटे,जयतीर्थ कुलकर्णी,नामदेव जेडगुले,सागर सोनटक्के यांनी रुपीनगर तळवडे परिसरात माजी सैनिक,जेष्ठ नागरिक व परिसरातील माता भगिनींच्या हस्ते महाआरती करून फायरशो व फटाक्यांची आतिषबाजी करत १२५ किलो बुंदीचे लाडू वाटप केले.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राज्य उपाध्यक्ष हेमंत डांगे यांनी चिंचवड येथे महाआरती करून १०१ किलो लाडूंचे वाटप करत आनंद साजरा केला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपशहराध्यक्ष राजू सावळे व पवना नगर मित्र मंडळाच्या वतीनेने प्रभु रामाचे पुजन,भजन,सत्यनारायणाची पुजा,महाप्रसादाचे आयोजन करून आनंदउत्सव साजरा करण्यात आला .

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपविभागअध्यक्ष देवेंद्र निकम व शिवपार्वती मित्र मंडळाचे कार्यकर्ते यांच्या वतीने सहयोगनगर, तळवडे या ठिकाणी २१ जोडप्यांच्या हस्ते महाआरती केली.

महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना चिंचवड विधानसभा विभागअध्यक्ष वैशाली बोत्रे व काळुबाई कॉलनी च्या वतीने राम,हनुमान,लक्ष्मण, सीता हे रूप बनवण्यात आले तसेच हनुमान रामाच्या भेटीसाठी आले हा लुक करत जल्लोष साजरा केला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना भोसरी विधानसभा संघटक जयसिंग भाट,उपविभाग अध्यक्ष सत्यम पत्रे,शाखा अध्यक्ष चेतन कुलकर्णी,विक्रम भोसले, व महाराष्ट्र सैनिक यांच्या वतीने रंगनाथ माधव जोशी आयोध्या कारसेवक 1992 यांचा पाय धुऊन विधीवत पूजा करून शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला

भोसरी विधानसभा उपविभाग अध्यक्ष अंकित शिंदें व शाखा अध्यक्ष मांतू राठोड यांच्या वतीने राम मंदिर भोसरी या ठिकाणी महाआरती करण्यात आली.

संबंधित लेख

लोकप्रिय