(मुंबई) :– ज्येष्ठ कवी व राजकीय कार्यकर्ते वरवरा राव यांना कोरो नाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती म्हणून त्यांना मुंबईतील जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वरवरा राव हे भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी अटकेत होते.
८१ वर्षीय वरवरा राव यांनी प्रकृती चांगली नाही. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खूपच ढासळली असल्याचे तुरुंगातील त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले होते. त्यामुळेच त्यांना जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातच आज कोरोनाची लागण झाल्याची माहिती जे जे रुग्णालयाचे डीन डॉ. रणजित माणकेश्वर यांनी दिली.
दरम्यान, वरवरा राव यांचं खुप वय झालं असून त्यांची प्रकृतीही ढासळत आहे,त्यामुळे त्यांना जामीन देण्यात यावा, अश्या प्रकारची मागणी विविध सामाजिक कार्यकर्त्यानी केली आहे. याचसंदर्भात राव यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयात तात्पुरत्या जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र जामीन अर्ज कोर्टाने फेटाळून लावला आहे.