देश विदेश
१)भारत कुलभूषण जाधवांची न्यायिक प्रक्रियेची चाचणी घेत आहे
दिल्ली, भारत: गुप्तचर असल्याचा आरोप असलेले भारताचे कुलभूषण जाधव जात असलेल्या न्यायिक प्रक्रियेची भारत चौकशी करत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी स्वत: वरील सर्व आरोप मान्य केले होते.
२) सैन्य सीमेवरून मागे घेण्याची प्रक्रियेमध्ये नेहमी पडताळणी करण्याची गरज आहे : भारतीय सैना
दिल्ली, भारत: भारत आणि चीन सर्व जास्तीचे सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया संपूर्णत: करणार असल्याचे दोन्ही देशांनी पत्रकार परिषदेत सांगितले. १५ तास चाललेल्या चर्चेनंतर हा निर्णय पत्रकारांना सांगण्यात आला.
३)एक कमिटी जम्मु आणि कश्मिरमधील इंटरनेट सेवेचा आढावा घेईल असे भारताच्या केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले
दिल्ली, भारत: इंटरनेट सेवा रद्द केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात त्याविषयी सरकारला विचारणा करण्यात आल्यानंतर सरकार त्याविषयी कमिटी नेमणार असल्याचे सरकारी वकिलांनी कोर्टात सांगितले.
४)भारताने कोरोना बाधीतांच्या संख्येत १० लाखाचा आकडा पार केला
दिल्ली, भारत: भारतात कोरोनाचा प्रार्दुभाव अजूनही थांबलेला नाही. भारताने आज १० लाख कोरोना बाधितांचा आकडा पार केला तर २५००० च्या वरती लोक मृत्यू पावले आहेत.
५)पाकिस्तान चीनवरुन आलेल्या मदतीने पाकिस्तान व्याप्त कश्मिरमध्ये धरण बांधणार
इस्लामाबाद, पाकिस्तान: मे महिन्यात भारताने ताकिद दिल्यावर ही पाकिस्तान पाकव्याप्त कश्मिरमध्ये चीनकडून आलेल्या मदतीच्या आधारे धरण बांधणार आहे. भारताच्या वतीने संपूर्ण जम्मू कश्मिर भारताचा भाग आहे असे पून्हा एकदा भारताच्या परराष्ट्र खात्याकडून सांगण्यात आले.
६)युरोपिय संघाच्या न्यायालयाने युरोपिय माहिती अमेरिकाला जाणे कायदेशीर नसल्याचे सांगितले
लंडन, ब्रिटन: युरोपिय संघाच्या न्यायालयाने लागू केलेला निर्णय जून्या माहितीवरती लागू होणार नसल्याचे कोर्टाने सांगितले. युरोपात नागरिकांच्या माहितीसाठी कडक नियमांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले .
७)जगातील सुप्रसिद्ध लोकांची जसे बिल गेट, बिदेन, ओबामा यांसारख्या लोकांची ट्विटर खाती हॅक झाली
न्युयार्क, अमेरिका: जगातील सुप्रसिद्ध व्यक्तीची ट्विटर खाती हॅक झाली. यावर कंपनीकडून कोणतेही कारण अजून सांगण्यात आलेले नाही. त्यांनी फक्त हॅक झालेले खातेधारक पासवर्ड चेज करू शकत नाहीत आणि कोणतेही ट्विट जोपर्यंत चौकशी पुर्ण होत नाही असे सांगितले.
८)पेट्रोलियम उत्पादन करणाऱ्या देश खनिज तेलाचे जास्तीचे उत्पादन करणार
न्युयार्क, अमेरिका: शहर बंदी जशी संपत आहे तसे मागणी खनिजतेलाची मागणी वाढत आहे. त्यामुळे जास्तीचे उत्पादन केले पाहिजे असे पेट्रोलियम उत्पादक देशांनी सांगितले.
९) ब्रिटन आणि अमेरिकेने रशिया कोरोना वरील लसीची परिणामात आलेली माहिती चोरण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगत आहे
लंडन, ब्रिटन: कोरोना वरती लस कोण तयार करणार यावर सर्व देशांचे लक्ष असताना लसीच्या परिक्षणाचे अहवाल रशिया चोरण्याचा प्रयत्न करत असल्याचे अमेरिका आणि ब्रिटनने सांगितले.
१०) चीनची अर्थव्यवस्था ३.२ % च्या वृद्धीदराने वाढेल असा अहवाल शहरबंदी संपल्यावरती चीनमध्ये प्रसिध्द झाला
बीजिंग, चीन: जग आर्थिक संकटात जात असताना चीनचा वृद्धिदर ३.२ % राहणार असल्याचे चीनने प्रसिध्द केले. हा दर शहर बंदीमुळे कमी झाला असल्याचे असे चीनकडून सांगण्यात आले.