Thursday, December 12, 2024
HomeNewsहजारो श्रमिकांनी लॉकडाऊनच्या विरुद्ध घरोघरी केला सरकारचा निषेध; ९ ऑगस्टला अभूतपूर्व आंदोलनाची...

हजारो श्रमिकांनी लॉकडाऊनच्या विरुद्ध घरोघरी केला सरकारचा निषेध; ९ ऑगस्टला अभूतपूर्व आंदोलनाची घोषणा.

सोलापूर (प्रतिनिधी) : येथील हजारो श्रमिकांनी लॉकडाऊनच्या विरुद्ध घरोघरी राहून सरकारचा निषेध केला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने लॉकडाऊनला विरोध करत आंदोलन पुकारले आहे. 

श्रमिकांनी लॉकडाऊनच्या विरुद्ध घरोघरी केला सरकारचा निषेध केला असून आजच्या आंदोलनात १० लोकांनी सहभाग घेतल्याचे माकपने म्हटले आहे. तसेच ९ ऑगस्टला अभूतपूर्व आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन हे प्रभावी व एकमेव पर्याय किंवा उपाय असू शकत नाही. लोकांच्या आरोग्यासोबत रोजगार ही महत्वाचा आहे. दहा दिवस शहरातील व जिल्ह्यातील हातावर पोट असणाऱ्या कष्टकरी कामगारांच्या बाबत सरकार किंवा प्रशासन आपली कोणतीच भूमिका वा तरतूद केलेली दिसून येते नाही. अन्नाविना माणसे जगूच शकतील का ?

जनता विरुद्ध लादलेल्या या बेकायदेशी लॉकडाऊन निषेधार्थ शहरात १० हजार कुटुंबं आपल्याला घरासमोर लॉकडाऊन मागे घ्या, जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ रोखा, इंधनदरवाढ मागे घ्या, संपूर्ण लॉकडाऊनच्या काळातील वीज बिल माफ करा, केंद्र सरकारकडून मोफत अन्नधान्य व दरमहा साडेसात हजार रुपये आर्थिक मदत द्या, भरमसाठ बिलाची  आकारणी करणाऱ्या खाजगी व सहकार तत्वावर चालणाऱ्या दवाखानाच्या व्यवस्थापनावार कारवाई करा, राज्य सरकार १० हजार रुपयांची आर्थिक मदत करा अशा निषेधाचे फलक दाखवून तीव्र निदर्शने केले. याबाबत शरद पवार यांच्या सोलापूर दोऱ्यादरम्यान भेट घेण्याचा प्रयत्न राहिल, असे माकपचे ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी सांगितले. 

आडम मास्तर म्हणाले की, “या बंद काळात कारखानदारांनी विडी, यंत्रमाग कामगारांना किमान दोन हजार रुपये मदत करावे, राज्य सरकार कडे १० हजार रुपयांची आर्थिक मदत मिळावी ही मागणी घेऊन १ लाख श्रमिकांनी अर्ज दाखल केले याचा निर्णय घेऊन रोख अनुदान ९ ऑगस्ट च्या आत अदा न केल्यास न भूतो न भविष्यती असे तीव्र व आक्रमक आंदोलन करण्यात येईल.”

आंदोलनात माकपचे जिल्हा सचिव अँड. एम. एच. शेख, माजी नगरसेविका सुनंदा बल्ला,  माजी नगरसेविका नसीमा शेख, श्रीनिवास गड्डम, अनिल वासम,  माजी नगरसेविका नलिनी कलबुर्गी, दाऊद शेख, जावेद सगरी, विक्रम कलबुर्गी, दत्ता चव्हाण, मल्लेशम कारमपुरी, अशोक बल्ला आदीसह मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

संबंधित लेख

लोकप्रिय