१. अमरावती जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर दहावी-बारवीच्या शाळा सुरु करण्यात येणार.
कोरोना आपत्तीमुळे राज्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय अद्याप झाला नाही. दहावी, बारावीच्या विद्याार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून अमरावती विभागात ५ ऑगस्टपासून प्रायोगिक तत्त्वावर वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. प्रत्येक तालुक्यात एक वर्ग भरवण्यात येणार असून, हा प्रयोग यशस्वी झाल्यास सर्वत्र दहावी, बारावीचे वर्ग सुरू करण्यात येतील, अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली.
२. हार्वर्ड यूनिवर्सिटीमार्फत रैडक्लिफ फ़ेलोशिपची घोषणा.
हार्वर्ड यूनिवर्सिटीमार्फत रैडक्लिफ फ़ेलोशिप प्रोग्राम ची घोषणा करण्यात आली आहे. यामार्फत निवड झालेल्या ५० विद्यार्थ्यांना ७८ हजार डॉलर स्टाइपेंड सोबतच ५ हजार डॉलर अतिरिक्त दिले जाणार आहेत. अधिक माहिती www.radcliffe.harvard.edu/
या संकेतस्थळ उपलब्ध आहे.
३. मोठी मुले ही कोरोना पसरवू शकतात; आता शाळा सुरू करणे धोकादायक .
१० ते १९ वयोगटातील तरुण मुले ही वयोवृद्ध लोकांसारखेच कोरोना पसरवू शकतात, असे दक्षिण कोरिया मध्ये केलेल्या एक संशोधनातून समोर आले आहे. जवळपास ६५ हजार जणांवर संशोधन केल्यावर हे समोर आलं आहे. संशोधकांच्या मते, जर आता शाळा व कॉलेज सुरू झाले तर कोरोनाचा फैलाव अधिक होण्याची भीती आहे.
४. जैनम राजा AME-CET परीक्षेमध्ये देशात प्रथम.
एयरक्राफ्ट मेंटेनेन्स इंजीनियरिंग कॉमन एंट्रेंस टेस्ट (ए एमई सीईटी,एयर) मध्ये अमरावती गवर्मेंट पॉलीटेकनिक कॉलेज चा विद्यार्थी जैनम राजा याने ८४.४४ टक्के गुण मिळवून देशात पहिला क्रमांक पटकावला आहे.
५. सीमा भागात स्थापन करण्यात येणाऱ्या महाविद्यालयाच्या कामाला गती देण्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्र्यांचे निर्देश.
महाराष्ट्र – कर्नाटक सीमाभागाची शैक्षणिक गरज लक्षात घेऊन मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर संचलित नवीन शासकीय मराठी महाविद्यालय स्थापन करण्यात येणार आहे. या महाविद्यालयाच्या कामाला अधिक गती द्यावी यासाठी आवश्यक ती प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली सीमा भागातील मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी नवीन शासकीय मराठी महाविद्यालय स्थापन करण्यासंदर्भात आढावा बैठक संपन्न झाली.