Thursday, December 12, 2024
HomeNewsजनभूमी साहित्य ,कॉलेजचा निरोप घेताना ..! - महेश गाडेकर

जनभूमी साहित्य ,कॉलेजचा निरोप घेताना ..! – महेश गाडेकर


कॉलेजचा निरोप घेताना….!

कॉलेज च्या पहिल्या दिवसापासून   

कॉलेजच्या शेवटच्या दिवसा मधील अंतर म्हणजे कॉलेज जीवन होय.

कॉलेज ला ऍडमिशन घेण्याचे प्रत्येकाचे वेगवेगळे हेतू 

असतात,तसा माझाही एक निव्वळ हेतू होता. नवीन मित्रमैत्रिणीं बनवणे , Enjoy करणे. शालेय आयुष्यात

शाळेच्या  वेळेमधेच जावं लागतं असे ,शाळेच्या ड्रेस कोड मध्येच पण कॉलेज Life ला अशी बंधने नव्हती.

      कॉलेज आयुष्यातील माझा पहिला दिवस ; मी बी.ए.ला  ऍडमिशन घेतलं होतं. पहिला दिवस कोण विसरू शकतो? मी पहिल्या दिवशी एफ.वाय. बी.कॉम. च्या वर्गामध्ये बसलो होतो, मग काय ? वर्ग शिक्षकांनी प्रत्येकाला उठवलं की, तुम्ही कोणत्या कॉलेज मधून आलात ? तुम्हाला आयुष्यात काय व्हायचे आहे ? प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपापल्या पद्धतीने उत्तरे दयायला सुरवात केली. मग वेळ माझ्यावरती आली. मी सरळ उत्तर दिले की, सर मला एम.एस.डब्ल्यू. करून समाज सेवा करायची आहे.सगळी मुले माझ्याकडे पाहत होती.मनामध्ये भीतीच वातावरण होतं. मधली सुट्टी झाली, आणि मग काय ? मी बारावीला असताना माझ्या वर्गांतील एक मित्र भेटला आणि मग त्याने मला आमच्या बी.ए.च्या वर्गात घेऊन गेला. 

दुसऱ्या दिवसापासून नियमित कॉलेज ला जाणे चालू होतं. मग कॉलेज मधील एन. एस.एस. मधील स्वयंसेवक झालो. Not me but you हे एन.एस.एस. च ब्रिद वाक्य अगदी मनाशी कोरुन ठेवलं होतं.’माझ्यासाठी नाही, आपल्यासाठी’ पुढे हळू हळू जडणघडण चालू होती. तेवढ्यात विद्यार्थी चळवळीचे धडे ही अनुभवायला मिळाले. विद्यार्थ्यांच्या जीवनात कोणकोणत्या अडचणी असतात ? त्या जवळून पाहिल्या. विद्यार्थी चळवळी मधील एक सक्रीय कार्यकर्ता होत चाललो होतो.विद्यार्थ्यांच्या समस्या, गरजू विद्यार्थ्यांना वसतिगृहात मध्ये प्रवेश मिळवून देणे, विद्यार्थ्यांनाच्या प्रश्नांवर्ती काम करणे हे चालूच होते.पण एकीकडे असे वाटत होते की,आपण येथे कश्यासाठी आलो आहोत ? हे प्रश्न मनामध्ये घोळत असताना देखील विद्यार्थी चळवळीत काम करत असताना सतत वेगवेगळ्या विषयावरील वाचणं चालू होतं. त्यामूळे फारसं काही वाटलं नाही बघता बघता कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला येऊन पोहचलो.वर्ष भरात वेगवेगळ्या विभागाच्या सहली, राष्ट्रिय सेवा योजनेतील हिवाळी शिबिरे , कॉलेजस्पर्धा ,कित्येक गोष्टी मनाला बेधुंद करणाऱ्या. आमचे प्राचार्य नेहमी सांगायचे की , शेवटच्या वर्षातील मुलं ही हातात आलेलं पीक आहे. शेतकरी वर्षभर शेतात कष्ट करतो, तेव्हा वर्षाच्या शेवटी पीक येतंय.अगदी तसंच ते आम्हाला आमच्या मनावर्ती बींबवायचे. आयुष्याचा मनमुरादपणे आनंद आम्ही आमच्या कॉलेजच्या आयुष्यात घेतला आयुष्यातील हे दिवस जीवनातील अविस्मरणीय क्षण म्हणून कायमचे मनात घर करून राहिले आहेत.

      शेवटच्या दिवशी कॉलेजचा निरोप घेताना सर्वच आठवणी मनामध्ये येतं होत्या अलगत एक एक अश्रु डोळयातून पडत होते. आता आपन जबाबदार नागरिक होणार आहोत.

आठवणी या अशा का असतात ? ओंझळ भरलेल्या पाण्यासारख्या. नकळत ओंझळ रिकामी होते आणि मग उरतो फक्त ओलावा.

       प्रत्येक दिवसाच्या आठवणींचा !

महेश गाडेकर

गोहे खुर्द , ता.आंबेगाव जि. पुणे 

संबंधित लेख

लोकप्रिय