देश विदेश
१) युरोपिय संघाने कोरोनावर आणि त्यामुळे उद्भवलेल्या आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी १५७ लाख कोटीचे पॅकेज दिले
ब्रुसेल, बेल्जियम: सलग चार दिवस चाललेल्या चर्चेनंतर युरोपिय संघाने शेवटी कोरोना निधी निर्माण केला. याआधीच युरोपिय देशांनी त्यांचा अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी पॅकेज दिलेले आहेत.
२)ब्राझीलामध्ये आतापर्यंत ८०००० पेक्षा जास्त लोक कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले
रिओ, ब्राझील: जगातिक कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना ब्राझीलची परिस्थिती बिकट होत चालली आहे. फक्त सोमवारी २०००० पेक्षा जास्त बाधीतांची नोंद झाली.
३) नेपाळमध्ये कम्युनिष्ट पक्षाची आज बैठक झाली, परंतु त्यातून कोणताही निशकर्ष निघू शकला नाही
काठमांडू, नेपाळ: नेपाळच्या पंतप्रधानांचे भवितव्य ठरवणारी नेपाळच्या कम्युनिष्ट पक्षाची बैठक पुन्हा निष्फळ ठरली. नेपाळचे पंतप्रधान ओलींच्या कार्यालयात ही बैठक झाली होती.
४) ग्रेटा थुनबर्ग या पर्यावरणा विषयी केलेल्या कामबद्दल मिळालेले ९ कोटीचे पारितोषिक पर्यावरणावाद्यांच्या समूहाला दान केले
स्टोकहोम, स्कॉटलॅड: पर्यावरणाविषयी जगातिक पातळीवर आंदोलन करणाऱ्या ग्रेटा थेनबर्गने तिला मिळालेले ९ कोटीचे पारितोषिक पर्यावरणवादी समूहाला दान केला. त्यावेळस बोलताना तिने हे पारितोषिक किती आहे याबाबत मला माहिती नाही पण ते दान करण्यासाठीच आहे, असे सांगितले.
५) भारताने चीनमधून आयात होणाऱ्या कमी दर्जाच्या धाग्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले
दिल्ली, भारत: भारतातील कापड उद्योगपती चीनमधून आयात झालेल्या धाग्यांच्या प्रतीवर प्रश्न उपस्थित करणारे निवेदन दिल्यानंतर चीनमधून आयात होणाऱ्या धाग्यांची चौकशी करण्याची चौकशी केली.
६) कोरोना प्रार्दुभावामुळे प्रगतीशील देशांवरील कर्ज माफ व्हावे अशी मागणी कर्ज विरोधी समुहाने केली
रिओ, ब्राझील: ब्राझीलच्या माजी राष्ट्राध्यक्ष दिल्मा रौस्सेफ यांनी कर्जदार देशांचे कर्ज आता फेडण्याची क्षमता नसल्यामुळे माफ करण्यात यावे अशी मागणी कर्जपूरवठा करणाऱ्या देशांकडे केली.
७) उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जो ऊन यांनी दवाखाना चांगला बांधत नसलेल्या अधिकाऱ्यांचे निलंबन केले
सेऊल, दक्षिण कोरिया: उत्तर कोरियाच्या राष्ट्राध्यक्ष किंम यांनी दवाखाना चांगला बांधत नाही, वापरले जाणारे साहित्याचे कारण देत त्याप्रकल्पावर काम करण्याऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित केले. आरोग्य सुविधा चांगल्या झाल्याच पाहिजेत असेही त्यांनी सांगितले.
८) ब्रिटनने चीनबरोबरील नागरिक हस्तांतर करार रद्द केला
लंडन, ब्रिटन: चीनने हॉगकॉगवर लावलेल्या सुरक्षा कायद्याच्या निषेधार्थ ब्रिटनने चीनबरोबरील नागरिक हस्तांतर करार रद्द केला. तसेच चीनकडून कायदाचा दुरुपयोग होणार नाही याची काळजी घेण्यासाठी काय उपाययोजना केल्या गेल्या याची खातरजमा होत नाही तोपर्यंत पुन्हा करार केला जाणार नसल्याचे सांगण्यात आले.
९) यावर्षाची अमरनाथ यात्रा रद्द
दिल्ली, भारत: यावर्षी अमरनाथ यात्रा होणार नसल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. कोरोनाचा प्रार्दुभाव लक्षात घेता हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले.
१०) चीनने ब्रिटनला परिणामांला सामोरे जावे लागेल असे सांगितले
बीजिंग, चीन: हॉगकॉग वर लादलेल्या कायद्यामुळे ब्रिटने चीनबरोबरील नागरिक हस्तांतर करार रद्द केला. त्यामूळे चीनने ब्रिटनने याच्या गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल अशी धमकी दिली.