१. मानव संसाधन मंत्री, डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी केले “मनोदर्पन” चे उद्घाटन.
कोरोना संकटाच्या वेळी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचे मानसिक आरोग्य आणि भावनिक कल्याण साधण्यासाठी पंतप्रधान ई-विद्यादान कार्यक्रमांतर्गत सुरू करण्यात आलेल्या “मनोदर्पण” वेबसाइटचे व राष्ट्रीय टोल फ्री नंबरचे केंद्रीय मानव संसाधन मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी काल २१ जुलै रोजी सकाळी ११ वाजता उदघाटन केले. ८४४८४४०६३२ हा राष्ट्रीय टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे.
२. जेईई आणि एनडीएच्या परीक्षा एकाच दिवशी होणार नाही?
जेईई आणि एनडीएच्या परीक्षा येत्या ६ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी होणार होत्या. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांमध्ये चिंतूचे वातावरण होते. परंतु मानव संसाधन मंत्री डॉ. रमेश पोखरीयाल निशंक यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, दोन्ही परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांविषयी शिक्षकांनी चर्चा केली आहे. विद्यार्थ्यांना काळजी करण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे.
३. एआयसीटीई अंतिम वर्षाची परीक्षा होणार.
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) ने मुंबई उच्च न्यायालयात माहिती दिली आहे, की त्यांनी सर्व डिमांड विद्यापीठ आणि त्यांच्या संलग्न संस्थांना यूजीसीच्या निर्देशानुसार अंतिम वर्षाची परीक्षा घेण्यास सांगितले आहे. हायकोर्टाने प्रतिज्ञापत्र दाखल करून घेताना ही माहिती दिली आहे. परीक्षा घेणे का महत्वाच्या आहेत याचे स्पष्टीकरण ही दिले आहे. एआयसीटीईने संबंधित संस्थांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन परीक्षा घेण्यास सांगितले आहे. आता या याचिकेवर ३१ जुलै २०२० रोजी सुनावणी होणार आहे.
४. जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी लाच घेताना जाळ्यात.
मुख्याध्यापकांच्या बदलीसाठी चार हजार रुपयांची लाच घेताना जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी दिलीप वाघाये यांना भंडारा येथील एन्टी करप्शन ब्यूरो ने मंगळवारी रात्री पकडले.
५. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ईडब्ल्यूएस शिष्यवृत्ती.
बड़ी4स्टडी फाऊंडेशन ने दहावी पास झालेल्या इकॉनॉमिकली कमकुवत सेक्शन (ईडब्ल्यूएस) म्हणजेच आर्थिक परिस्थिती खालावली असलेल्या विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविले आहेत. अकरावी आणि बारावीच्या शैक्षणिक वर्षामध्ये आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना आधार देणे हे योजनेचे उद्दीष्ट आहे. सदळ विद्यार्थ्यांला दहावीत किमान ५० टक्के गुण असणे गरजेचे आहेत, तसेच कुटुंबाचे एकूण उत्पन्न ६ लाख रुपये असावे, अशी अट आहे. ३२ जुलै ही अंतिम मुदत आहे. अधिक माहिती www.b4s.in/dbl/EWS1 या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
६. ‘या’ तारखेच्या आत लागणार ‘दहावी’चा निकाल.
राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी हिंगोलीमध्ये बोलताना ३१ जुलैपूर्वी दहावीचा निकाल लागेल, असं सांगितलं होतं. परंतु अद्याप महाराष्ट्र बोर्डाकडून दहावीच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. आता विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष दहावीच्या निकालाकडे लागलेले आहे.
संकलन – अमित हटवार