Thursday, December 12, 2024
HomeNewsजनभूमी साहित्य , मानवतेचा आंत झालाय - रोहिदास बोऱ्हाडे

जनभूमी साहित्य , मानवतेचा आंत झालाय – रोहिदास बोऱ्हाडे

मानवतेचा आंत झालाय

मानवतेचा आंत झालाय,

मान सन्मान सोडुन दिलाय

भेदभावान केलाय वेष

मुखातला गोडवा संपलाय

जिभेवर अडकलाय शब्द

भारत माझा देश

जातीभेदन वैर केलाय

लाल रक्ताला विसरून गेलाय

तु आदिवासी ,तु दलीत

जातीत आम्हाला तुच्छ लेखाया

पुढारलेला समाज पुढं आलाय

मानवतेचा आंत झालाय

मानवतेचा महामंत्र विसरलाय

उच्च-नीच्च तेचा मंत्र जपलाय

जातिभेदाच वादळ उठलय

रोज, रोजच्या दंगलीमध्ये

समाजवादच कपाळ फुटलय

मानवतेचा आंत झालाय

स्वातंत्र्य, लोकशाही, समाजवादाचा,

पुकार देशान आमच्या केलाय

मानवतेच्या रक्तान देश आमचा

लाल झालाय,

भाऊ बंधाच नात मात्र

सुकल्या पाकळीत गळून गेलाय

मानवतेचा आंत झालाय

रोहिदास मंता बोऱ्हाडे

देवळे, ता- जुन्नर, जि- पुणे.

संबंधित लेख

लोकप्रिय