Sunday, December 22, 2024
Homeजुन्नरराजाराम फासे यांना जुन्नर शहर भूषण पुरस्कार

राजाराम फासे यांना जुन्नर शहर भूषण पुरस्कार

जुन्नर / आनंद कांबळे : जुन्नर शहर ज्येष्ठ नागरिक संघ यांच्यावतीने दिला जाणारा जुन्नर शहर भूषण पुरस्कार राजाराम निवृत्ती फासे यांना पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हेमंत गरीबे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, गौरव चिन्ह देवून गौरविण्यात आले.

हा पुरस्कार अनिल मोरेश्वर जोगळेकर यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ ठेवलेल्या आर्थिक योगदानातून दिला जातो असे संघाचे अध्यक्ष सुधाकर वाडकर यांनी दिली. कार्यक्रमास अनिल जोगळेकर, रत्नाकर आवटेे, धोंडोपंत जुन्नरकर, सुभाष आवटे, अजित परदेशी, पोपट भास्कर, डाँ.प्रमिला जुन्नरकर, अलकाताई फुलपगार आदि मान्यवर उपस्थित होते.

हा पुरस्कार मला प्रेरणादायी ठरेल ,माझ्या भ्रमंतीला ही उर्जा आहे असे यावेळी फासे यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचलन श्रीकांत देशपांडे यांनी केले तर आभार गोविंद हिंगे यांनी मानले.

संबंधित लेख

लोकप्रिय