कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात १४९.२७ दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वा. च्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून ४०० तर अलमट्टी धरणातून ३३६१७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे.
पंचगंगा नदीवरील- इचलकरंजी हा एक बंधारा पाण्याखाली आहे. नजिकच्या कोयना धरणात ५०.११ टीएमसी तर अल्लमट्टी धरणात ८५.०७३ इतका पाणीसाठा आहे.
जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा पुढीलप्रमाणे :
◆ तुळशी ५४.५९ दलघमी
◆ वारणा ६२२.७२ दलघमी
◆ दूधगंगा ४६९.५५ दलघमी
◆ कासारी ४८.६७ दलघमी
◆ कडवी ३८.४० दलघमी
◆ कुंभी ५०.३८ दलघमी
◆ पाटगाव ७३.०४ दलघमी
◆ चिकोत्रा २२.४० दलघमी
◆ चित्री २७.४२ दलघमी
◆ जंगमहट्टी २३.१८ दलघमी
◆ घटप्रभा ४४.१५ दलघमी
● जांबरे २३.२३ दलघमी
◆ कोदे (ल पा) ६.०६ दलघमी
बंधाऱ्यांची पाणीपातळी पुढीलप्रमाणे :
राजाराम १३.३ फूट, सुर्वे १६ फूट, रुई ४२ फूट, इचलकरंजी ३९ फूट, तेरवाड ३८ फूट, शिरोळ ३०.३ फूट, नृसिंहवाडी २२.९ फूट, राजापूर १२.९ फूट तर नजीकच्या सांगली ६ फूट व अंकली ५.१ फूट अशी आहे.