मुंबई : ग्रामरोजगारसेवक मनरेगा, रोहयो कंत्राटी कर्मचारी कोरोना योद्धांंना विमा संरक्षण देण्याची मागणी आयटक संघटनेच्या वतीने राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. तसेच कोरोनामुळे निधन झालेल्या दिवंगत ग्रामरोजगार सेवक देवेंद्र रायबोले यांना त्वरित मदत देण्याची मागणी केली आहे.
सध्या राज्यभर रोजगार हमी योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी कंत्राटी कर्मचारी अधिकारी, ग्राम रोजगारसेवक कार्यरत आहेत. आता कोरोना काळात त्यांना विमा संरक्षण व प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा, अशी मागणी ‘आयटक’ने केली होती.
अमरावती जिल्ह्यातीलतील दर्यापूर तालुक्यातील नांदरून गावातील ग्रामरोजगारसेवक देवेंद्र रायबोले गावात रोहयोचे काम करत होते, सद्या वृक्षलागवड चे काम ते पाहत होते. त्यासाठी त्यांना तालुक्याला ये-जा करावी लागत होती. मात्र त्यांना कोरोना झाल्याने दवाखान्यात ऍडमिट करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्यामागे १ मुलगा १ मुलगी पत्नी असा परिवार आहे. तसेच जळगाव जिल्ह्यातील कंत्राटी तांत्रिक कर्मचारी विश्वजित चौधरी यांचाही मृत्यू झाला आहे. दोन मुलं पत्नी असा त्यांचा परिवार आहे. या पार्श्वभूमीवर शासनाच्या वतीने त्वरित कुटुंबला आर्थिक मदत देण्याची मागणी संघटनेने केली असल्याचे आटकचे राज्य अध्यक्ष राजू देसले यांनी सांगितले.
रोजगार हमी योजनेत कंत्राटी कर्मचारी, अधिकारी व ग्रामरोजगार सेवक यांची महत्वाची भूमिका आहे. रोहयोची सुरुवात महाराष्ट्र प्रथम झाली. मात्र आज महाराष्ट्र मागे आहे इतर राज्यात ग्रामरोजगारसेवक ना दरमहा निश्चित मानधन ६ हजार रुपये दरमहा व कामप्रमाणे प्रोत्साहन भत्ता कमिशन मिळते. व कंत्राटी कर्मचाऱ्यांना मानधन ही २० हजार रुपये पेक्षा अधिक आहे. महाराष्ट्र सरकार गेली १० वर्ष मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम करत असताना त्यांना विमा संरक्षण व प्रोत्साहन भत्ता मिळणे आवश्यक आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे.
राजू देसले
राज्य अध्यक्ष, आयटक
ग्रामरोजगरसेवक मजुरांचे रेकॉर्ड ठेवणे देखरेख ठेवण्याचे काम ग्रामपंचायत, पंचायत समिती, वन व कृषी विभागाच्या वतीने काम करीत आहेत. गावात झालेल्या अकुशल कामावर अल्प मानधन दिले जाते. महाराष्ट्र भर २२ हजार ग्राम रोजगार सेवक कार्यरत आहेत. उच्चशिक्षित सेवकांना दरमहा २ हजार रुपये सुध्दा मिळत नाही.
ग्रामरोजगार सेवक कोरोना संकट काळात ग्राम स्तरीय कोरोना प्रतिबंधक समितीत सदस्य म्हणून काम करीत आहेत. कोरोना काळात मोठया प्रमाणात मजुरांना गाव पातळीवर रोहयो चे काम सुरू आहे, त्यांना विमा संरक्षण व प्रोत्साहन भत्ता गावात तसेच गेली ३ महिन्यापासून चे थकीत मानधन त्वरित द्यावे. राज्य शासनाकडे सातत्याने ग्राम रोजगारसेवकांना दरमहा ६ हजार रुपये कामाचा मोबदला व प्रवास खर्च दरमहा ५०० रुपये देण्यात यावेत, अशी मागणी केली आहे, परंतु शासन गांभीर्याने विचार करत नसल्याचे आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघटनेने म्हटले आहे.
सामाजिक सुरक्षा व कोरोना काळात शासनाने जाहीर केलेले ५० लाखाचे विमा संरक्षण व प्रोत्साहन भत्ता देण्यात यावे, इतर राज्य प्रमाणे वेतन देण्यात यावे, समान कामाला, समान वेतन सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाप्रमाणे देण्यात यावे, किमान वेतन २१ हजार रुपये त्वरित लागू करावे व प्रवास भत्यात वाढ करावी या मागण्या करण्यात आल्या आहेत.