Thursday, December 12, 2024
HomeNewsहरित वारीच्या तरुणांचा पुढाकार; निसर्ग संवर्धनासाठी आगळावेगळा उपक्रम. वाचा सविस्तर

हरित वारीच्या तरुणांचा पुढाकार; निसर्ग संवर्धनासाठी आगळावेगळा उपक्रम. वाचा सविस्तर

माळशिरस :  श्री क्षेत्र भुलेश्वर मंदिर व शक्तीबाबा मठ परिसरात तरूणांनी निसर्ग संवर्धनासाठी पुढाकार घेत एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. सुटीचा दिवस सार्थकी लागावा म्हणून येथील काही युवकांनी महिन्याला प्रत्येकी दोनशे रुपये वर्गणी गोळा करून पर्यावरण संवर्धनासाठी एक प्रयत्न केला आहे. 

   ‘हरित वारी फाउंडेशन’च्या माध्यमातून सुरू केलेला हा उपक्रम आता सर्वांना आपलेसे वाटत असून, झाडे लावून जन्मदिवस साजरा करण्याचा नवीन पायंडा पडला आहे. यासाठी पुरंदर तालुक्याच्या पूर्वभागातील श्री क्षेत्र भुलेश्वर मंदिराचा परिसर सेलिब्रेशन पॉईंट ठरत आहे.

   फाउंडेशनच्या या उपक्रमामुळे आज श्री क्षेत्र भुलेश्वर पायथा, शक्ती बाबा मठ व परिसरात वड, पिंपळ, कडुलिंब, चिंच, झांबूळ, सिसम आदी प्रकारची २५०० झाडे डौलाने उभी आहेत. शक्ती बाबा मठावरील टाक्यातून पाणी शेंदून व भर उन्हाळ्यात टँकरने पाणी घालून हजारो झाडे जगवली आहेत. पाणी वाया जाऊ नये म्हणून ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला आहे. पर्यावरण संवर्धन व पशु – पक्ष्यांच्या किलबिलाटासाठी लॉकडाऊन काळातही आवश्यक खबरदारी घेऊन हरित वारी फाउंडेशन वृक्षलागवड करीत आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय