१)व्हिएतनाममध्ये तीन महिन्यात प्रथमच नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळला
हानोई, व्हिएतनाम: कडक विलगिकरणाचे नियम, सर्वांच्या चाचणीसाठी अट्टाहास यामूळे व्हिएतनामने ४१५ वरती कोरोनाचा प्रार्दुभाव थांबवला. त्याव्यक्तीच्या संपर्कात आलेले १०३ लोक चाचणीत कोरोनाबाधित आढळले नाही, तरीही खबरदारी म्हणून त्यांना विलगिकरणात ठेवले आहे.
२)सिंगापूरचा नागरिक चीनसाठी गुप्तचर म्हणून काम करताना दोषी आढळला
वॉशिग्टन, अमेरिका: सिंगापूरच्या नागरिकाने २०१५ मध्ये चीनच्या गुप्तचर अधिकाऱ्याबरोबर काम सुरू केले. त्याने प्रथम आशियाई देशांची गुप्त माहिती मिळवण्यासाठी काम केले, त्यानंतर त्याला अमेरिकेवरती लक्ष्यकेंद्रीत करायला सांगितले गेले होते.
३)हजारो व्यक्ती रशियाच्या सरकारविरोधात सलग तिसऱ्या आठवडी सुट्टीला रस्त्यावर
मॉस्को, रशिया: खाबारोवस्क या रशियाच्या पूर्वेकडील राज्याच्या गव्हर्नरला हत्येच्या आरोपाखाली अटक केल्यानंतर लोकांनी आंदोलन सुरू केले आहे. त्या राज्याच्या गव्हर्नरने आरोपांना नकार दिला आहे.
४)अमेरिकेने नवीन परदेशी विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासेसला घेण्यास नकार दिला
वॉशिग्टन, अमेरिका: अमेरिकेने नवीन परदेशी विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला बंदीचे आदेश दिले. मागिल निर्णय रद्द केल्यावर हा नवीन निर्णय अमेरिकेने लागू केला. जोपर्यंत कोरोनासाथीमुळे कोणात्याही परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नये असा निर्णय अमेरिकेच्या सरकारने केल्याचा सरकारकडून स्पष्ट करण्यात आले.
५)तालिबानने अफगाणिस्तान सरकारबरोबर ईद नंतर चर्चा करणार असल्याचे सांगितले
इस्लामाबाद, पाकिस्तान: अफगाणिस्तान सरकारकडून झालेल्या हवाई हल्ल्यानंतर अफगाणिस्तान सरकारबरोबर चाललेली बातचीत तेथेच थांबली होती. परंतु, तालिबानकडून त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली गेली नाही. तसेच तालिबान पुन्हा चर्चा करण्यासाठी तयार असल्याचे तालिबानच्या प्रवत्याकडून सांगण्यात आले.
६) भारताच्या कर्नाटक आणि केरळमध्ये ISIS चे काही सभासद असल्याचा जागतिक संघाच्या (UN) अहवालात उल्लेख
दिल्ली, भारत: जागतिक संघाच्या अहवालानुसार भारतातील कर्नाटक आणि केरळमध्ये ISIS या दहशतवादी संघटनेचे सभासद आहेत. त्यामध्ये पाकिस्तान, बांग्लादेश, भारत आणि म्यानमार देशांमधून १५०-२०० सभासद असल्याचे अहवालात नमुद केले आहे.
७)अमेरिकेची लढाऊ विमाने सिरियामध्ये इराणच्या प्रवासी विमानाच्या जवळून उडाली, त्यामुळे भीतिचे वातावरण तयार झाले होते
तेहराण, इराण: अमेरिकेची लढाऊ विमाने इराणच्या प्रवासी विमानाच्या खूप जवळून सिरियाच्या हद्दीत उडाली, त्यामुळे प्रवास्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. लढाऊ विमाने जवळुन उडत असल्यामुळे वैमानिकांना विमान तातडीने उतरावावे लागले.
८)व्हिएतनामने जंगलीप्राण्याची आयात बंदिचा आदेश आरोग्याच्या भीतीमुळे लागू केला
हानोई, व्हिएतनाम: जंगलीप्राण्याच्या व्यापारावर बंदी घालत व्हिएतनामने दुसऱ्या देशातून देशातून आणण्यात येणाऱ्या अंडी आणि लारवीवरती ही बंदी घालण्यात आली.
९)हंगेरीत एडिटर इन चीफला नोकरीवरून काढल्यावर चॅनलच्या मोठ्याप्रमाणात पत्रकारांनी राजीनामे दिले
बुडापेस्ट, हंगेरी: स्वतंत्र पत्रकारतेवर गदा चॅनल आणत असल्याचा दावा करत त्या चॅनलच्या पत्रकारांनी राजीनामे दिले. काही दिवसांपूर्वी एडिटर ईन चीफला पदावरून काढून टाकण्यात आले होते.
१०)रशियामध्ये गेल्या २४ तासात ५८७१ लोक कोरोनाबाधित झाले
मॉस्को, रशिया: रशियामध्ये कोरोनाबाधितांची संख्या ८०६७२० वरती पोहोचली. त्यामध्ये १३१९२ लोकांचा मृत्यू झाला असून ५९७१४० लोक आतापर्यंत बरे झाले आहेत.