देश विदेश
१) अफगाणिस्तानने जागतिक सुरक्षा परिषदेला पाकिस्तानच्या सुरक्षा दलाने सीमेचे उल्लंघन केल्याचे सांगितले
काबूल, अफगाणिस्तान: पाकिस्तानी लष्कर सीमेवरती तोफेने हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी सुरक्षा रक्षकांच्या चौक्यांवरती आणि सामान्य नागरिकांच्या वस्तीवरती हल्ले केल्याचे अफगाणिस्ताने सांगितले. त्यामुळे जागतिक सुरक्षा परिषदेने त्याविषयी तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी अफगाणिस्तान सरकारकडून करण्यात आली.
२) ऑस्ट्रेलियामध्ये स्थालांतरित कामगार येण्यात २ लाख पेक्षा जास्तची घट
सिडनी, ऑस्ट्रेलिया: ऑस्ट्रेलियामध्ये परदेशी नागरिक स्थलांतर करतात आणि त्यामुळे त्यांची अर्थव्यवस्था मोठ्याप्रमाणात वृद्धी करत आहे. परंतू, कोरोनास्थितीमुळे स्थलांतरावर मोठ्याप्रमाणात प्रभाव पडलेला दिसतो. हे स्थलांतर आता ३१००० नागरिकांवरती पोहोचण्याची शक्यता ऑस्ट्रेलियामधील अर्थशास्त्रज्ञांनी वर्तवली.
३) पोलंड महिलांवरील हिंसाचार थांबवण्यासाठी असलेला करार रद्द करणार: पोलंडचे सरकार
वार्सा, पोलंड: पोलंडमध्ये सरकारने महिलांवरील हिंसाचार थांबवण्यासाठी युरोपिय संघाबरोबर असलेला करार रद्द करण्यासाठी अर्ज केला. त्यामुळे तेथील सरकार विरूद्ध महिलांनी मोठ्याप्रमाणात आंदोलन सुरु केले आहे. सरकारने या करारामुळे पालकांच्या हक्कावरती गदा येत असल्याचे सांगितले.
४) ऑस्ट्रेलियाने चीनचा व्हिएतनाम बेटावरील दावा नामंजूर नसलेल्याचे सांगितले
सिडनी, ऑस्ट्रेलिया: चीनने व्हिएतनामच्या बेटावर केलेला दावा मंजूर नसल्याचे ऑस्ट्रेलियाने जागतिक संघाला लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे. तसेच चीनचा दाव्याला कोणताही कायदेशीर पाया नसल्याचे ऑस्ट्रेलियाकडून सांगण्यात आले.
५) गेल्या २ दिवसात जगात ५६०००० लोक कोरोना बाधित झाले
पॅरिस, फ्रेंच: जगात कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्याप्रमाणात वाढ होत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. कोरोना प्रार्दुभावाचा वेगही मोठ्याप्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे.
६) चीनने चेंगडूमधील पासपोर्ट कार्यालय बंद करायला सांगितल्यानंतर अमेरिकेने बंद करण्याची प्रक्रिया सुरू केली
चेंगडू, चीन: अमेरिकेने चीनचे हॉस्टन मधील पासपोर्ट कार्यालय बंद करायला लावल्यानंतर चीनने ही अमेरिकेचे पासपोर्ट कार्यालय बंद करायचे आदेश दिले.
७) पाकिस्तानमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये १ सैनिक मृत्यूमुखी तर ३ व्यक्ती गंभीर जखमी झाल्या
इस्लामाबाद, पाकिस्तान: बलुचिस्तान तसेच खैबर पखटून प्रांतामध्ये पाकिस्तान सुरक्षा रक्षकांवरती मोठ्याप्रमाणात हल्ले होत आहेत. १४ तारखेला ३ सुरक्षा रक्षक आणि ८ लोक जखमी झाले होते.
८) अमेरिकेने त्यांचे शिष्टमंडळ अफगाणिस्तानला शांतते विषयी चर्चा करण्यासाठी पाठवले
वॉशिग्टन, अमेरिका: अफगाणिस्तान बरोबरील करारनुसार अमेरिकेच्या सैन्याला अफगाणिस्तान सोडता येत नसल्यामुळे अमेरिकेने तालिबान सोबत चाललेल्या शांतता चर्चा लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी आपले शिष्टमंडळ अफगाणिस्तानला पाठवल्याचे अमेरिकेच्या सरकारने सांगितले.
९) श्रीलंकेने कोरोना प्रार्दुभाव थांबवण्यासाठी विलगिकृत केलेल्यासाठी प्रथम मतदान घेतले
कोलंबो, श्रीलंका: कोरोना प्रार्दुभाव वाढत असताना निवडणूक घेण्यासाठी श्रीलंकेने विलगिकृत व्यक्तीसाठी प्रथम वेगळे मतदान घेतले. त्यानंतर मतदानाच्या तारखेला इतर लोक मतदान करणार असल्याचे स्पष्ट केले.
१०) ब्लाक लाइव्ह मॅटर अंतरगत अमेरिकेत पुन्हा मोठे आंदोलन
सियाटल, अमेरिका: काळा वर्णाच्या व्यक्तीची पोलिसांकडून खुन होत असल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर अमेरिकेत मोठ्या प्रमाणात आंदोलने सुरू झाली आहेत. त्याचाच भाग म्हणून सियाटल येथे मोठा जमाव जमला होता. त्यावेळी काही व्यक्तीकडून मोठी आग लावण्यात आली त्यावेळेस पोलिसांकडून काही व्यक्तीला अटक ही करण्यात आली.