देश विदेश
१) अफगाणिस्तान गोळीबार बंदीला तालिबानकडून सकारात्मक प्रतिसाद, अपहरण केलेल्या ३ पैकी २ नागरिकांची सुटका
काबूल, अफगाणिस्तान: ईदच्या सनामुळे अफगाणिस्तान सरकारने तालिबानबरोबर आदेश दिले होते. तसेच ३०० तालिबानचे सभासदांना शांतता करारासाठी सोडल्यानंतर तालिबाननेही अपहरण केलेल्या ३ पैकी २ भारतीय नागरिकांची सुटका केली.
२) पाकिस्तान न्यायालयाने भारताच्या कुलभूषण जाधवसाठी ३ वरिष्ठ वकिलांची नेमणुक करण्याचे आदेश दिले
इस्लामाबाद, पाकिस्तान: गुप्तहेर असल्याच्या आरोपाखाली भारताच्या कुलभूषण जाधव यांनी फाशीची शिक्षा झाल्यानंतर भारताने त्यांना चांगले वकिल मिळत नसल्याचा आरोप केला होता. त्यामुळे पाकिस्तानचे न्यायालय स्वत: ३ वरिष्ठ वकिलांची केससाठी नेमणुक करणार आहे.
३) भारत आणि चीनच्या तुलनेत अमेरिका कोरोना आपत्तीवर चांगल्याप्रकारे कामगिरी करत आहे: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प
वॉशिग्टन, अमेरिका: भारताला कोरोना आपत्तीला सामोरे जाताना खूप अडचणींना सामोरे जावे लागत आहे तर चीनला कोरोना मोठ्याप्रमाणात प्रसारू नाही म्हणून मोठ्याप्रमाणात प्रयत्न करावे लागत. त्यांच्या पेक्षा अमेरिका चांगली कामगिरी करत असल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केला.
४) म्यानमारच्या अंग सा सु क्यी यांनी निवडणूक दुसऱ्यांना लढवणार
यानगॉन, म्यानमार: म्यानमारमध्ये पहिली निवडणूक जिंकल्यानंतर आता दुसऱ्यांदा सरकार निवडून यावे यासाठी म्यानमार अंग् सा सु क्यी यांनी पुन्हा निवडणूक लढवण्यासाठी अर्ज भरला. मागिल निवडणूकी नंतर त्यांना लष्कराबरोबर सत्ता वाटून घ्यावी लागली होती.
५) माजी ब्रिटिश व्यापारी मंत्राच्या ई-मेल मधून गुप्त व्यापाराची माहिती चोरीला
लंडन, ब्रिटन: सुत्रांच्या हवाल्याने समोर आलेल्या माहिती नुसार ब्रिटनच्या माजी व्यापारी मंत्राच्या ई मेल मधील व्यापाराची गुप्त ठेवण्यात आलेली माहिती चोरीला गेलेली आहे. त्यामध्ये अमेरिका आणि ब्रिटनमध्ये होणाऱ्या व्यापारांची ही माहिती चोरीला गेलेली आहे. त्याविषयी पोलिस यंत्रणा तपास करत आहे.
६) कोरोनामुळे शिक्षणात मोठा अडथळा इतिहासात प्रथमच झाला आहे: जागतिक संघ
जिनिव्हा: कोरोना आपत्तीने जगात कमीत कमी ४ कोटी लहान बालके त्यांची शाळेचा मुकलेली आहेत असे जागतिक संघाने सांगितले. तसेच या आपत्तीमुळे कमीत कमी १६ कोटी विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणावरती टांगती तलवार राहणार असून कमीत कमी २.५ कोटी विद्यार्थ्यांवर पैशाच्या अभावापाई शिकता येणार नाही.
७) स्पेनचे माजी राजा जुआन कार्लोस यांनी त्यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप पाहता देश सोडण्याचा निर्णय घेतला
माद्रिद, स्पेन: स्पेनमध्ये कोरोना प्रार्दुभाव मोठ्याप्रमाणात झालेला असून त्यामध्येच तेथील माजी राजा जुआन कार्लोस यांनी देश सोडण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे राजेशाही वाजवण्यासाठी केला जाणारा प्रयत्न असल्याचे तज्ञ मांडत आहेत. परंतु त्यांच्यावर सिद्ध झालेले भ्रष्टाचाराचे आरोप त्यांना देश सोडयला सोपे उत्तर तयार करत आहे.
८) इस्त्राईलच्या सीमेवरील कुंपणाला मोठ्या शस्त्र हल्ल्याने तोडण्याचा प्रयत्न केल्यावर हवाई दलाने सिरियावरती मोठे हल्ले केले: इस्त्राईल लष्कर
जेरूसलेम, इस्त्राईल: इस्त्राईल सैन्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला जात असल्यामुळे इस्त्राईल कडून त्याला प्रतिउत्तर म्हणुन हल्ला करण्यात आला असल्याचा इस्त्राईलने दावा केला. परंतु सिरियाकडून इस्त्राईलने जाणून बुजून हल्ला केला आणि मोठे नुकसान केले असा दावा करण्यात आला आहे.
९) जागतिक आरोग्य संघटनेने चीनमध्ये कोरोना प्रार्दुभावावर होणारी प्राथमिक चौकशी पूर्ण
बीजिंग, चीन: जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाचा झालेला उगम आणि प्रसार यावर चौकशी करण्याची आणि चीनी सरकारबरोबर चर्चा करण्यासाठी पाठवलेल्या पथकाने सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे. आता जागतिक आरोग्य संघटना चौकशीसाठी मोठी टीम चीनला पाठवणार आहे.
१०) ॲन्टीबॉडी चाचणीतून १५ लाख इटलीच्या नागरिकांना कोरोना झालेल्याचे समोर आले
रोम, इटली: ॲन्टीबॉडी चाचणी जी प्रथमदर्शी कोरोनासाठी केली जाते त्यानुसार इटलीच्या १५ लाख लोकांना कोरोना झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. परंतु आता पर्यंत समोर आलेल्या प्रकारानुसार ॲन्टीबॉडी चाचणी फक्त प्राथमिकता दर्शवते.