Sunday, December 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC: व्हिडीओ न्यूज:मुलींचा अरंगेत्रम् भरत नाट्यम शास्त्रीय आविष्कार दि 27 डिसेंबर रोजी...

PCMC: व्हिडीओ न्यूज:मुलींचा अरंगेत्रम् भरत नाट्यम शास्त्रीय आविष्कार दि 27 डिसेंबर रोजी गदिमा प्रेक्षागृह येथे

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:भरत नाट्यम मधील महत्वाचा टप्पा म्हणजे असतो.चिंचवड मधील होतकरू मुलींच्या एका टीमने 8 वर्ष अत्यन्त मेहनत जिद्द करून हे भरत नाट्यम् मधील शिक्षण पूर्ण केले आहे.
हा कार्यक्रम पहायला मिळणे ही रसिकांसाठी व लोकांसाठीएक आनंदाची पर्वंणीच असते.
कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट,कलाश्री नृत्यशाला यातून शिक्षण घेतलेल्या गुरु,सायली काने/पवार यांच्या मार्गदर्शनाने हे शिक्षण पूर्ण केलेल्या,
कु.असावारी मधुकर बच्चे,तन्वी राजू कोरे,वरदा जय ताम्हाने,सिद्धी पूनमचंद चोरडीया या मुलींचा अरंगेत्रम् हा कार्यक्रम बुधवार दि 27 डिसेंबर रोजी सायंकाळी 6:00 वाजता ग.दि.माडगुळकर नाट्यगृह प्राधिकरण निगडी येथे आयोजित केला आहे.
या कार्यक्रमास माजी नगरसेवक,भाजपा पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष::शंकर जगताप,आमदार उमा खापरे,भरत नाट्यम कोरोग्राफर अरुंधती पटवर्धन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहाणार आहेत.

कार्यक्रम सर्वांना आनंद देणारा व मंत्रमुग्ध करणारा असेल हा विश्वास या सर्व मुलींना आहे.
या कार्यक्रमाचा सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आनंद घ्यावा व आपल्या उपस्थितीतून या सर्व मुलींना शुभेच्छा व आशीर्वाद द्यावेत असे विनम्र आवाहन आयोजकांच्या वतीने जनसेवक मधुकर ब. बच्चे
7385546681यांनी केले आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय