Monday, December 23, 2024
Homeजुन्नरजुन्नर : दिव्यांग मोफत आवश्यक साहित्य साधने करीता नाव नोदणीचे आवाहन

जुन्नर : दिव्यांग मोफत आवश्यक साहित्य साधने करीता नाव नोदणीचे आवाहन

जुन्नर : रविवार दिनांक 19/11/23 रोजी श्री राधेश्याम संस्था याच्या वतीने संस्थेच्या कार्यालयात  दिपक चव्हाण संस्थापक अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनात मिटिंग चे आयोजन करण्यात आले होते.

जुन्नर तालुका व परिसरातील दिव्यांग लोकांना श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केंद्र महाराष्ट्र राज्य ग्रुप जुन्नर तालुका व सामाजिक संस्थाच्या वतीने लवकरच जुन्नर मध्ये दिव्यांग जनजागृति अभियान अंतर्गत जुन्नर तालुका व परिसरातील सर्व दिव्यांग व जेष्ठ नागरिक लोकांना जनजागृति व्हावी म्हणून कार्यक्रम चे आयोजन करण्यात येत असून कार्यक्रमात दिव्यांग लोकांना शासनाच्या विविध योजना, आरोग्य शिबिर, आधार कार्ड, आभा कार्ड, आयुष्मान कार्ड, दिव्यांग लोकांना व जेष्ठ नागरिकांना आवश्यक साधने साहित्य मध्ये तीन चाकी सायकल, काठी, वाॅकर, कुबडया, कृत्रिम हात, पाय, कॅलिपर, बूट, कानाची मशीन, डोळे तपासणी करून आवश्यक असल्यास ऑपरेशन व नंबरचे चश्मा मोफत वाटप करण्यात येणार आहेत.  

तसेच दिव्यांग लोकांना मनोरंजन कार्यक्रम, (युनिक कार्ड) ऑनलाइन प्रमाण पत्र नोदणी, दिव्यांग लोकांना वैयक्तिक 2 लाख रुपये चा विमा काढण्यात येणार आहे. तसेच इतर वधूवर सुचक मेळावाचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे, असे संस्थापक अध्यक्ष दिपक चव्हाण यानी सागितलेे

तसेच सदर कार्यक्रमात अगोदर दिव्यांग लोकांनी संस्थेच्या कार्यालयात आपले दिनांक 22/11/2023 ते 30/11/2023 पर्यंत नाव नोदणी करणे आवश्यक आहे. कार्यालय रविवार सुधा सुरू रहणार आहे तरी जुन्नर तालुका व परिसरातील सर्व दिव्यांग लोकांनी आपले नाव नोदणी करून योजना चा लाभ घ्यावा असे आवहान सभेच्या अध्यक्ष वसंत काफरे मानव विकास परिषद महा .ग्रामीण अध्यक्ष यानी केले आहे. 

यावेळी अरुण शेरकर अध्यक्ष, दत्तात्रय हिवरेकर गुरूजी कार्याध्यक्ष, राहुल मुसळे उपाध्यक्ष, सौरभ मातेले, सुनिल जंगम, शेख अहमद इनामदार, श्रीहरी नायकोडी, केरभाऊ नायकोडी, जालिंदर ढोमसे, वर्षाताई शिंदे, लताताई ताजवे, अजिज पठान, अनंत हाडवले, बाळकृष्ण आहीरे आंबेगाव विभाग, लक्ष्मण बांगर, केशव मुकणे, विजय शेळके, सोपान खैरे व दिव्यांग बाधव उपस्थित होते. यावेळी श्री अरुण शेरकर अध्यक्ष यानी दिव्यांग व जेष्ठ नागरिक लोकांना व सामाजिक कार्यकर्ता यानी गरजू पर्यंत माहित देवून योजना चा लाभ घ्यावाा, असे आवहान केले आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय