Monday, December 23, 2024
Homeराज्यलॉकडाऊनमध्ये जीवाची बाजी लावणाऱ्या हंगामी आणि कंत्राटी कामगारांंना बोनस द्या - क्रांतिकुमार...

लॉकडाऊनमध्ये जीवाची बाजी लावणाऱ्या हंगामी आणि कंत्राटी कामगारांंना बोनस द्या – क्रांतिकुमार कडुलकर

पिंपरी चिंचवड : लॉकडाऊनमध्ये जीवाची बाजी लावणाऱ्या हंगामी आणि कंत्राटी कामगारांंना बोनस देण्यात यावे, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे क्रांतिकुमार कडुलकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

महाराष्ट्र राज्यातील ज्या कारखान्यांमध्ये १० किंवा त्यापेक्षा अधिक कामगार कामावर ठेवण्यात आलेले असतील, त्या सर्व कामगारांना किमान ८.३३ % दराने किंवा अधिनियमात विहित केलेल्या सूत्रानुसार २० % पर्यंत बोनस देणे सर्व नियोक्त्यांना या अधिनियमाने बंधनकारक केलेले आहे. सर्व कारखान्यांना व आस्थापनांना, त्यांनी नफा मिळवण्यास सुरुवात केलेले वर्ष, किंवा त्यांच्या व्यवसायाचे सहावे वर्ष, यांपैकी जे काही आधी असेल, त्या वर्षापासून हा अधिनियम लागू आहे. या अधिनियमात “सेट ऑन” व “सेट ऑफ” या योजनेशी निगडीत असलेला बोनस देण्याचीदेखील तरतूद आहे. त्याचप्रमाणे, त्यामध्ये किमान ८.३३% या दराने उत्पादकतेशी निगडीत बोनस देण्याचीही तरतूद आहे. शिवाय, बोनस देणे बंधनकारक करणारी यंत्रणा उभी करण्याच्या तरतुदीदेखील आहेत. पुणे, पिंपरी चिंचवड, चाकण, तळवडे, तळेगाव, भोसरी इ. औद्योगिक परिक्षेत्रातील आस्थापने आणि तत्सम नोंदणीकृत संस्थांना हा कायदा लागू आहे. लॉकडाउन काळात १८ ते २५ वयोगटातील हजारो कामगारांनी आपले श्रममूल्य कवडी मोलाने राष्ट्रीय हितासाठी उद्योगाची चक्रे सुरु करण्यासाठी अर्पण केले आहे, त्यामुळे बोनस दिला जावे, अशी मागणी माकपने केली आहे.

शिकाऊ उमेदवार वगळता; रुपये ७,५०० पेक्षा कमी वेतनावर कामावर ठेवलेले सर्व कामगार बोनस मिळण्यास पात्र होतात. तथापि, जे कामगार अफरातफर, आस्थापनेच्या आवारात हिंसक वर्तन, चोरी, आस्थापनेच्या कोणत्याही मालमत्तेशी घातपात, इत्यादी कारणांवरून कामावरून कमी करण्यात आलेले असतील, असे कामगार अधिनियमा अंतर्गत बोनस मिळवण्यास पात्र होणार नाहीत. बोनस मिळवण्यास पात्र होण्यासाठी कामगाराने एका आर्थिक वर्षामध्ये आस्थापनेची किमान ३० दिवसांची सेवा करणे अधिनियमानुसार आवश्यक आहे. तक्रारी आल्यास कायदेशीर कारवाई करू असा इशारा गणेश दराडे, सतीश नायर, क्रांतिकुमार कडुलकर, सुकुमार पोन्नपन, वीरभद्र स्वामी, बाळासाहेब घस्ते, सुभाष कालकुंद्रीकर, ख्वाजा जमखाने, संजय ओहोळ यांंनी दिला आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय