Sunday, January 5, 2025
Homeराष्ट्रीयमीडियाला खिळखिळा करण्याचा हा प्रयत्न – सिताराम येच्युरी

मीडियाला खिळखिळा करण्याचा हा प्रयत्न – सिताराम येच्युरी

नवी दिल्ली : मिडियाला खिळखिळा करण्याचा प्रयत्न असल्याची टीका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस कॉम्रेड सिताराम येच्युरी यांनी केली आहे.

दिल्ली पोलिसांनी मंगळवारी सकाळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (CPIM) सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्या अधिकृत शासकीय निवासस्थानावर दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने चौकशी केली. केंद्राने सीपीआयएम सरचिटणीस येचुरी यांना मंजूर केलेल्या कॅनिंग रोड येथील निवासस्थानी ही चौकशी करण्यात आली. कारण येथे ‘न्यूजक्लिक’ चे काम करणारे सुमित राहतात. त्यांचा मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आले आहे ‌.


हा छापा मीडिया आउटलेट ‘न्यूजक्लिक’शी जोडलेल्या संस्थांवर सुरू असलेल्या ऑपरेशनचा भाग असल्याचे सांगितले जाते. या शासकीय निवासस्थानामागील इमारतीत न्यूजक्लिकचे पत्रकार सुमित राहतात. सुमितच्या शोधात पोलीस आल्याचे सांगण्यात येत आहे. आज सकाळी पोलिसांनी न्यूजक्लिक संदर्भात 30 ठिकाणी छापे टाकले.

याबाबत येचुरी म्हणाले की, पोलीस कशाची चौकशी करत आहेत? कोणालाच माहिती नाही. हा मीडियाला खिळखिळी करण्याचा हा प्रयत्न आहे का? त्यांच्यावर काय आरोप आहेत? छापेमारी मागचे कारण देशाला कळले पाहिजे’. न्यूजक्लिक या ऑनलाइन पोर्टलशी संबंधित 30 ठिकाणी पोलिसांनी छापे टाकले आहेत. यासोबतच पोलिसांनी न्यूजक्लिकशी संबंधित पत्रकारांच्या घरांचीही झडती घेत आहेत.

संबंधित लेख

लोकप्रिय