Monday, December 23, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडबिगर आदिवासींच्या नावावरील जमिनी पेसा कायद्यानुसार आदिवासींना परत देण्याची मागणी

बिगर आदिवासींच्या नावावरील जमिनी पेसा कायद्यानुसार आदिवासींना परत देण्याची मागणी

जुन्नर : बिगर आदिवासींच्या नावावरील जमिनी पेसा कायद्यानुसार आदिवासींना परत द्या, अशी मागणी अंजनावळे ग्रामस्थांच्या वतीने गावाचे पेसा अध्यक्ष किशोर लांडे यांनी तहसीलदार रविंद्र सबनीस यांना ग्रामसभा ठरावसह निवेदन देऊन केली आहे. Demand to return lands in the name of non-tribals to tribals as per Pesa Act

आदिवासी भागातील अंजनावळे गावातील ग्रामस्थांनी ग्रामसभेत महत्वपुर्ण निर्णय घेतला असून आदिवासीसाठी असणारा पेसाअधिनियम २३, २४ व २५ नुसार आदिवासी मूळमालक व वहीवाटदार यांच्याकडुन बिगर आदिवासींनी घेतलेली जमीन त्या आदिवासी वहीवाटदार परत करण्यात यावी 

या संदर्भातील ठराव दि. २९ ऑगस्ट २०२३ रोजी ग्रामपंचायत अंजनावळे येथील ग्रामसभेत ठराव एकमताने पारित करण्यात आला. पेसा कायद्याच्या अंमलबजावणीची मागणी अंजनावळे गावाचे पेसा अध्यक्ष किशोर लांडे यांनी तहसीलदार रविंद्र सबनीस यांना ग्रामसभा ठरावसह निवेदन देऊन केली आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय