Monday, December 23, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडआळंदी मंदिरात श्रावणातील महाप्रसाद वाटप उत्साहात 

आळंदी मंदिरात श्रावणातील महाप्रसाद वाटप उत्साहात 

आळंदी / अर्जुन मेदनकर : तीर्थक्षेत्र आळंदी मंदिरातील प्रथा परंपरांचे पालन करीत श्रावण महिन्यात विविवध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. राज्यासह पंचक्रोशीतील भाविकांनी श्रींचे दर्शनास रांगा लावून गर्दी करीत श्रींचे दर्शन घेतले. श्रावण महिन्यात लाखो भाविकांनी श्रींचे दर्शनाचा लाभ घेतला. आळंदीतील परंपरांचे पालन करीत महाप्रसाद वाटप उत्साहात झाले. Mahaprasad distribution in Shravan in Alandi temple in excitement

श्रावण महिन्यातील प्रथांचे भाविकांनी धार्मिक महत्त्व लक्षात घेत श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील पुरातन श्री सिद्धेश्वर महाराज मंदिरात श्रीना अभिषेख पूजा करण्यास गर्दी करून दर्शन घेतला. श्रावणी सोमवार निमित्त मंदिरातील व्यवस्थापन समितीचे वतीने तसेच श्री आळंदी धाम सेवा समितीचे अध्यक्ष राहुल चव्हाण यांचेसह अनेक सेवक साधकांनी भाविकांना महाप्रसाद वाटप केले. यात केली, खिचडी, गुडदाणीचे लाडू प्रसाद, मिष्टांना महाप्रसादाचे वाटप आळंदी देवस्थानचे वतीने देखील करण्यात आले.

यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विकास ढगे पाटील, व्यवस्थापक माउली वीर, श्री आळंदी धाम सेवा समितीचे अध्यक्ष राहुल चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले. अखेरचे सोमवारी पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिरे समितीचे विश्वस्त प्रकाश महाराज जवंजाळ, प्रबोधन समितीचे अध्यक्ष रामेश्वर महाराज शास्त्री, श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोहन महाराज शिंदे, आळंदी जनहित फाउंडेशनचे अध्यक्ष अर्जुन मेदनकर, अविनाश राळे, महादेव पाखरे, अनिल जोगदंड, दिनकर तांबे, ज्ञानेश्वर घुंडरे पाटील, सचिन शिंदे, साईनाथ ताम्हाणे, उमेश बिडकर, ज्ञानेश्वर पोंदे आदी उपस्थित होते. 

तीर्थक्षेत्र आळंदीत विविध धार्मिक कार्यक्रम प्रसंगी होणारी प्रसाद वाटप सेवा अधिकाधिक प्रमाणात वाढत असून पंचक्रोशीत या सेवेची प्रेरणा घेऊन सामाजिक बांधिलकीतून उपक्रम राबविले जात असल्याचे युवा उद्योजक राहुल चव्हाण यांनी सांगितले.

संबंधित लेख

लोकप्रिय