Thursday, March 13, 2025

मराठा आरक्षण आंदोलकांवरील अमानुष लाठीचार्जचा पैठण वकील संघातर्फे निषेध

पैठण : जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे झालेल्या मराठा आरक्षण आंदोलकांवरील अमानुष लाठीचार्जचा पैठण वकील संघातर्फे निषेध व्यक्त करण्यात आला. या संदर्भात पैठण तहसीलदारांना वकील संघातर्फे निवेदन देण्यात आले. Paithan Lawyers Sangh protest against inhuman lathicharge on Maratha reservation protesters

शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर झालेला लाठीहल्ला हा क्रूर प्रकार असून नागरिकांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन आहे अशा भावना निवेदनात व्यक्त करण्यात आल्या. तसेच या घटनेला जबाबदार असलेल्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर बढतर्फीची कारवाई करून मराठा आरक्षणाचा प्रश्न तत्काळ मार्गी लावावा अशी मागणीही निवेदनाद्वारे शासनाकडे करण्यात आली.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

यावेळी वकील संघाचे अध्यक्ष ॲड. शकील बागवान, उपाध्यक्ष ॲड. कमलताई चव्हाण सचिव ॲड. रावसाहेब वाव्हळ, सहसचिव ॲड. गणेश काकडे, कोषाध्यक्ष ॲड. प्रवीण निवारे, ग्रंथालय प्रमुख ॲड. सचिन पाटील, ॲड. दिपक पहिलवान, ॲड. वैभव चव्हाण, ॲड. राजेंद्र गोर्डे, ॲड. संदीप जाधव, ॲड. प्रीतम साबू, ॲड. जाधव मॅडम, ॲड. शेख मॅडम, ॲड. विजयकुमार मुळे, ॲड. दादासाहेब दशपुते, ॲड. पंकज काकडे, ॲड. प्रताप वाकडे, ॲड. देवेंद्र गव्हाणे, ॲड. हनुमान फुंदे, ॲड. प्रवीण बढे, ॲड. अनिल बोबडे, ॲड. बाळासाहेब नवले, ॲड. उद्धव नजन, ॲड. वैद्य, ॲड. गणेश शिंदे, ॲड. आकाश जगताप ई. वकील बांधव उपस्थित होते.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles