Sunday, December 22, 2024
Homeराज्यव्हिडीओ : तामिळनाडूत ट्रेनला भीषण आग, आगीत 10 जणांचा होरपळून मृत्यू

व्हिडीओ : तामिळनाडूत ट्रेनला भीषण आग, आगीत 10 जणांचा होरपळून मृत्यू

मदुराई : तामिळनाडूत एका ट्रेनला भीषण आग लागल्याची माहितीत समोर येत आहे. तामिळनाडूतील मदुराई रेल्वे स्थानकात शनिवारी पहाटे एका थांबलेल्या ट्रेनच्या डब्यात अचानक आग लागली. या आगीत 10 जणांचा मृत्यू झाला आहे.

मदुराईचे जिल्हाधिकारी एम एस संगीता म्हणाल्या की, “आज पहाटे साडेपाच वाजता मदुराई रेल्वे स्थानकावर थांबलेल्या डब्याला आग लागली. या डब्यात उत्तरप्रदेशातील यात्रेकरू प्रवासी होते, सीतापूरच्या एका खाजगी ट्रॅव्हल एजन्सीने या कोचचे थर्ड पार्टी बुकिंग केले होते. त्यात 63 जण प्रवास करत होते.

सकाळी त्यांनी कॉफी बनवण्यासाठी आणि गॅसची शेगडी पेटवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सिलेंडरचा स्फोट झाला. 55 जणांना वाचवण्यात यश आले आहे आणि आत्तापर्यंत आम्ही नऊ मृतदेह बाहेर काढले आहेत. रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे, असेही जिल्हाधिकारी संगीता यांनी पत्रकारांना सांगितले.

या दुर्घटनेनंतर दक्षिण रेल्वेने मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच दक्षिण रेल्वेचे प्रवक्ते बी गुगनेसन यांनी सांगितले की, मदुराई यार्डमधील पार्टीच्या डब्यात पहाटे 5.15 वाजता आग लागली. सकाळी 7.15 च्या सुमारास आग विझवण्यात आली, या डब्यातील प्रवाशांनी बेकायदेशीरपणे गॅस सिलिंडर आणून कॉफी बनवण्याचा प्रयत्न केल्यामुळे आग लागली. त्यानंतर प्रवासी बाहेर पडले असे रेल्वेने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय