मुंबई : राज्यातील सरकारी रुग्णालये, दंत महाविद्यालयांत 13 हजार 391 पदे रिक्त असून आयुर्वेद महाविद्यालयांत 876 पदे रिक्त आहेत. यातील गट अ व गट ब मधील रिक्त पदे सरळसेवेने व पदोन्नतीने भरण्याबाबत कार्यवाही सुरू असून येत्या काळात वैद्यकीय शिक्षण विभागातील सर्व पदे भरली जातील असे आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहे.
राज्यातील सरकारी रुग्णालयांत रिक्त असलेल्या पदांबाबत उपस्थित करण्यात आलेल्या तारांकित प्रश्नाला मंत्री मुश्रीफ यांनी उत्तर दिले आहे. सरळसेवेने आतापर्यंत प्राध्यापक संवर्गातील 91, सहायक प्राध्यापक संवर्गातील 525 पदे भरण्यात आली आहेत. प्राध्यापक संवर्गातील 117 अध्यापकांना पदोन्नतीने नियुक्ती देण्यात आली आहे. तर उर्वरित रिक्त पदे भरण्यात येत आहेत.
गट क संवर्गातील 5180 पदे भरण्याकरिता टीसीएसआयओएन कंपनीकडून स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. गट ड संवर्गातील पदे जिल्हास्तरीय समितीमार्फत भरण्यात येणार आहेत. त्यानुषंगाने संबंधित संस्थेचे अधिष्ठाता व संबंधित जिल्हाधिकारी यांना सूचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
■ एमपीएससीमार्फत पदे भरणार
● सरकारी आयुर्वेद महाविद्यालयातील सरळसेवेने भरावयाच्या अध्यापक संवर्गातील ११४ रिक्त पदांचे आरक्षण सामान्य प्रशासन विभागाकडून निश्चित करण्यात आले आहे.
● याविषयीची मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पाठविण्यात आले आहे. ही पदे भरेपर्यंत कंत्राटी तत्वावर पदे भरण्यात येणार आहेत.
■ दंत महाविद्यालयांतील रिक्त पदे : अधिष्ठाता – 8, प्राध्यापक – 245, सहयोगी प्राध्यापक – 400, सहायक प्राध्यापक – 1008, गट क – 7756, गट ड – 3974. एकूण 13391 पदे रिक्त आहेत.
■ सरकारी आयर्वेद महाविद्यालये : अधिष्ठाता – 2, प्राध्यापक – 26, सहयोगी प्राध्यापक – 44, सहायक प्राध्यापक – 86, गट क – 510, गट ड – 210. एकूण – 876 पदे रिक्त आहेत.
हे ही वाचा :
रत्नागिरी येथे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत भरती; आजच करा अर्ज
कराड येथे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती
PCM : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती; आजच करा अर्ज !
SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1876 जागांसाठी नवीन भरती; आजच करा अर्ज!
सांगली येथे महापारेषण अंतर्गत भरती; 3 ऑगस्ट 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख
पिंपरी चिंचवड सायन्स पार्क अंतर्गत भरती; 31 जुलै 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख
Mahatransco : पुणे येथे महापारेषण अंतर्गत भरती; आजच करा अर्ज !
MCGM : मुंबई महापालिकेत विविध पदांची नवीन भरती; पगार 25000 रूपये
मेगा भरती : महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालय अंतर्गत 1782 जागांसाठी भरती
ठाणे सिव्हिल हॉस्पिटल अंतर्गत विविध पदांसाठी भरती; आजच करा अर्ज
महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयात बंपर भरती, 10वी ते पदवीधरांना संधी
Bank of Maharashtra : बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदांच्या 400 जागांवर भरती
HCL : हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी बंपर भरती; 10वी, ITI उत्तीर्णांसाठी संधी
Railway : पश्चिम रेल्वे मुंबई मार्फत 3624 जागांसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरु; आजच करा अर्ज
UPSC : संघ लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांसाठी भरती
मेगा भरती : एकलव्य मॉडेल निवासी शाळा अंतर्गत 4062 पदांची भरती