पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : दि.२० – राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) कार्यकारिणीत जनतेत स्थान असणाऱ्या नेत्यांना सामावून घेण्याच्या दृष्टीकोनातून शहराच्या कार्याध्यक्षपदी ज्येष्ठ माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांची आज (दि. 20) नियुक्ती करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भोंडवे यांना निवडीचे पत्र दिले.
पिंपरी चिंचवड हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. तो अधिकाधिक मजबूत रहावा या दृष्टीकोनातून आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या नेत्यांना कार्यकारिणीत सामावून घेण्यात येत आहे. त्याच भूमिकेतून बुधवारी (दि. 19) अध्यक्षांसह पाच कार्याध्यक्षांची नियुक्ती उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात जाहीर केल्या आहेत. त्यानंतर आज मोरेश्वर भोंडवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मोरेश्वर भोंडवे हे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक असून चिंचवड विधानसभा मतदारसंघात त्यांचे मोठे वलय आहे. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघासोबत येणाऱ्या महापालिका निवडणुका डोळ्यासमोर सक्षम आणि जनतेमध्ये स्थान असणाऱ्या नेत्यांना राष्ट्रवादीकडून कार्यकारणीमध्ये स्थान देण्यात येत आहे.

प्रतिक्रिया
शहरात राष्ट्रवादी जोमाने वाढावी म्हणून मी कार्यरत राहणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली विकासाचा रथ वेगाने वाटचाल करेल याची मला खात्री आहे. पक्षाने मला दिलेल्या संधीचे मी सोने करेन.
मोरेश्वर भोंडवे, कार्याध्यक्ष (नवनिर्वाचित), राष्ट्रवादी काँग्रेस
हे ही वाचा :
उर्फी जावेदचा नवा टोमॅटो लूक पाहिलात का ? ज्याची होतेय जोरदार चर्चा
ब्रेकिंग : पोलीस भरती संदर्भात मोठी अपडेट आली समोर
ब्रेकिंग : माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कथित व्हिडीओ प्रकरणात नवीन अपडेट
विरोधकांच्या आघाडीचं नाव ठरलं! आता, ‘युपीए’ ऐवजी असेल ‘हे’ नाव
ब्रेकिंग : किरीट सोमय्या प्रकरणावर संंजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेलेली महिला फोटोच्या नादात गेली वाहून


