Thursday, December 12, 2024
Homeआंतरराष्ट्रीयव्हिडीओ : मेक्सिकोतील ज्वालामुखीचा भयानक उद्रेक, ३० लाख नागरिकांना सावधानतेचा इशारा !

व्हिडीओ : मेक्सिकोतील ज्वालामुखीचा भयानक उद्रेक, ३० लाख नागरिकांना सावधानतेचा इशारा !

मेक्सिको सिटी : मध्य मेक्सिकोतील पॉपोकेटपेटल नावाच्या ज्वालामुखीचा भयंकर उद्रेक झाला असून ज्वालामुखी परिसरातील ६० किमी परिघातील ३० लाख लोकांना सरकारने सावधानतेचा इशारा दिला आहे.हा ज्वालामुखी १९९४ साली प्रथम सक्रिय झाला,अति धोकादायक असे त्याचे वर्गीकरण करण्यात आले आहे.



मेक्सिको सिटी या महत्वाच्या शहराच्या ५४२५ मीटर उंचीच्या पर्वतावर रविवारी स्फोट होऊन धूळ व राख शहरभर ६० किमी परिघात पसरायला सुरवात झाली. सरकारने शाळा,महाविद्यालये सार्वजनिक कार्यक्रम व आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद केला आहे,असे फॉक्स न्यूजने म्हटले आहे.


संबंधित लेख

लोकप्रिय