‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाअंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचे लाभ सामान्य नागरिकांना देण्यात येत आहेत. या योजनांची माहिती सामान्यांना व्हावी व लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय लागतील हे या लेखाच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही देशातील नागरिकांसाठी एक वर्षाचे विमा संरक्षण असणारी एक अपघात विमा योजना आहे. या योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा. या योजनेत सहभागींना केवळ 20 रुपयांमध्ये 1 लाख ते 2 लाखापर्यंतची भरपाई मिळणार आहे.
● योजनेची वैशिष्ट्ये व अटी पुढीलप्रमाणे :
- एका वर्षाचे विमा संरक्षण असणारी ही एक अपघात विमा योजना आहे.
- दरवर्षी नूतनीकरण आवश्यक.
- १८ ते ७० वयोगटातील सर्व बचत बँक खातेधारक या योजनेत सहभागी होऊ शकतील.
- ऑटो डेबिट सुविधा उपलब्ध.
- योजनेचा कालावधी दर वर्षी 1 जून ते 31 मे असा राहील.
- विमा हप्ता रु. 20/- प्रती वर्ष राहील.
- विमा धारकाने वय वर्ष 70 पूर्ण केल्यावर / बँकेच्या बचत खात्यात विमा हप्ता नावे टाकण्यास पुरेशी रक्कम शिल्लक नसेल तर / बँक बंद केले तर विमा संरक्षण संपुष्ठात येईल.
- एकाचव्यक्तीची अनेक बचत खाती असतील तर अशी व्यक्ती कुठल्याही एकाच बचत खात्याद्वारे हा विमा उतरवू शकेल.
- विमा उतरविणाऱ्या व्यक्तीचा आधार क्रमांक पायाभूतमानला जाईल.
- तांत्रिक अडचणीमुळे संपुष्ठात आलेली विमा पॉलिसी काही अटींची पूर्तता केल्यावर पुन्हा चालू करता येईल.
● किती विमा मिळणार ?
- मृत्यू – रु. 2 लाख
- दोन्ही डोळ्याची संपूर्ण आणि बरी न होणारी हानी/ दोन्ही हात किवा दोन्ही पाय निकामी होणे/एक डोळा आणि एक हात किवा पाय निकामी होणे – रु. 2 लाख
- एका डोळ्याची संपूर्ण आणि बरी न होणारी हानी किवा एक पाय निकामी होणे – रु. 1 लाख
या योजनेसाठी जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँका, सर्व खाजगी बँका व ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यापैकी कोणत्याही बँकेत आपले बचत खाते असल्यास या योजनेचा लाभ घेता येईल. जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर या योजनेचा लाभ देण्यासाठी 30 जूनपर्यंत मोहीम राबविण्यात येत आहे. नागरिकांनी ग्रामपंचायत स्तरावरील या विशेष शिबिराला भेट देऊन योजनेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.
संकलन – नंदकुमार वाघमारे,
प्र. जिल्हा माहिती अधिकारी, ठाणे
हे ही वाचा:
वैद्यकीय संचालनालय, मुंबई अंतर्गत 6000+ पदांची मेगा भरती
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 209 पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती
पुणे येथे 10वी, 12वी, पदवीधर, डिप्लोमा, ITI उत्तीर्णांना सरकारी नोकरी संधी
ब्रेकिंग : टपाल विभागात 15,000 रिक्त जागांची मेगा भरती, आजच अर्ज करा
पुणे येथे रयत शिक्षण संस्था अंतर्गत 780 पदांची मेगा भरती
पुणे येथे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी अंतर्गत विविध पदांची भरती
पुणे येथील पोलीस दलाच्या आस्थापनेवरील विविध पदांची थेट मुलाखतीद्वारे भरती
पुणे येथे आर्मी लॉ कॉलेज अंतर्गत विविध पदांची भरती
पुणे येथे चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेत भरती; 10वी, 12वी, पदवीधर, डिप्लोमा, ITI उत्तीर्णांना संधी
SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1600 पदांवर भरती; 12वी उत्तीर्णांना संधी