माजलगाव (बीड) : विविध मागण्या न सोडविल्यास नगर परिषद समोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने तहसिलदारांना निवेदन देतेवेळी देण्यात आला.
निवेदनात म्हटले आहे की, सध्या आझादनगर व गौतम नगर भागातील रस्त्यांची व नाल्याची कामे न झाल्यामुळे या भागात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. येथील लोकांना ये-जा करण्यासाठी कसरत करावी लागत आहे. व तसेच काही लोकांच्या नळाला पाणी येत नाही.
सर्व भागातील रोड चे व नाल्यांची बांधकाम करून घेऊन घाणीचे साम्राज्य दुर करावे तसेच या भागातील पाईपलाईन फुटल्यामुळे लोकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी आपण या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन पाईपलाईन दुरूस्त करून सर्व लोकांना पाणी देण्याची व्यवस्था करावी. गौतम नगर भागातील नाल्याची साफसफाइ करा. व पाणी पुरवठा सुरूळीतपणे सुरू करा. माजलगाव शहरातील पाणीपुरवठा आठवडयातुन दोन वेळा सुरू करा, असेही म्हटले आहे.
निवेदनातील इतर मागण्या पुढीलप्रमाणे :
● आझाद नगर व गौतम नगर येथील सिमेंट रस्त्याचे कामे करण्यात यावे.
● चार दिवसाला पिण्याचाशुद्धपाणी सोडण्यात यावे.
● नाल्यांची खोली प्रमाणे साफसफाई करण्यात यावी.
● पथ दिवे लावण्यात यावे.
● प्रभागातील वंचीत राहीलेल्या लोकांना रितसर पावती फाडुन नळ कनेक्शन देण्यात यावे.
● ओ एस शाहेद अलीखान यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी.
निवेदन देतेवेळी कॉ. सादेक पठाण, कॉ. शेख महेबुब, कॉ. फारूख सय्यद, कॉ. शेख समीर, कॉ. शेख मुस्तकीम, कॉ. शेख चुत्रु, कॉ. शेख अन्वर हे उपस्थित होते.