Friday, September 20, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडसोलापुरात अवकाळी पावसाचा धुमाकूळ! लाखोंचे नुकसान.. पंचनामा लवकर करावा अशी मागणी...

सोलापुरात अवकाळी पावसाचा धुमाकूळ! लाखोंचे नुकसान.. पंचनामा लवकर करावा अशी मागणी…

पुणे : राज्यात अनेक ठिकाणी या पावसामुळं नुकसान झालं आहे.दरम्यान, सोलापूर (solapur) जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला.सोलापूर शहरासह अक्कलकोट, मोहोळ, दक्षिण सोलापूर, मंगळवेढा या तालुक्यात पावसानं हजेरी लावली.

कुठे शेती पिकांना फटका बसलाय तर कुठे घरांचं नुकसान झालंय.तर अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यामुळं झाडे उन्मळून पडली आहेत.विजेच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं सोलापूर शहरात अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत.

यामुळं काही ठिकाणी वाहतूक व्यवस्था खोळंबली होती. अग्निशमन दलाचे जवळपास 20 जवान झाडे वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न करत होते.
अनेकांच्या घरात पाणी शिरलं आहे. महावितरणच्या विद्युत यंत्रणाचे मोठे नुकसान झाले आहे.

शहरात 20 ठिकाणी विजेचे खांब पडले आहेत तर जवळपास 70 ठिकाणी विजेच्या तारा तुटून पडल्या आहेत. त्यामुळं सोलापुरातल्या अनेक भागात विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.ग्रामीण भागात झालेल्या पावसानं शेती पिकांचं नुकसान झालं आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय