महाराष्ट्र जनभूमी : दिव्यदृष्टी फाऊंडेशन आयोजित विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या डॉ. अनिता घाटगे (Zenith hospital), सोनाली पाठक (Teacher), मयुरी शुक्ला (businesswoman, Social Worker ), कांचन पवार (beautician ), अँड. मयुरी पी., माई गुचके ( Teacher, Social Worker) या विविध क्षेत्रातील महिलांना दिव्यदृष्टी फाऊंडेशन च्या संस्थापिका सौ कल्पना खरात यांनी “ती” चा गौरव सर्वांची जबाबदारी म्हणून सन्मानित केले.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या डॉ.अनिता घाडगे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीमाई च्या प्रतिमेला प्रमुख अतिथी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर वेशभुषा सादरीकरणाचा कार्यक्रम झाला.
यात सहभागी स्त्रियांनी रमाबाई आंबेडकर, सावित्रीबाई फुले, भारतीय संस्कृती, पदामावती, हिरकणी, इंदिरा गांधी यांच्या भूमिका साकारल्या होत्या. डॉ अनिता घाडगे यांनी स्त्री च्या हेल्थ समस्यांची माहिती सांगितली तसेच सोनाली पाठक यांनी एक स्त्री जबाबदाऱ्या मध्ये जखडून आहे, तिने स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे असे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शन करण्यात आला.