घोडेगाव : आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांना UPSC व MPSC परीक्षेचे मार्गदर्शन पुणे येथील विविध कोचिंग क्लासेस मध्ये उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी बिरसा ब्रिगेड च्या वतीने घोडेगाव प्रकल्प कार्यालयाकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, असंख्य विद्यार्थी शिक्षण पुर्ण होऊन घरी आहेत. आर्थिक परिस्थिती चांगली नसल्या कारणाने पुण्यात क्लासेस करू शकत नाही, परिणामी आदिवासी विद्यार्थी परिक्षेमध्ये कमी पडतात. त्यामुळे आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांना UPSC व MPSC परीक्षेचे मार्गदर्शन स्वयंम योजनेच्या धर्तीवर सुरू करा, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदन देतेवेळी बिरसा ब्रिगेड अध्यक्ष जांभोरी सुनील गिरंगे, बिरसा ब्रिगेड अध्यक्ष खेड तालुका एकनाथ तळपे, जांभोरी गावचे सरपंच संजय केंगले, ग्रामविकास प्रतिष्ठान अध्यक्ष नांदूरकीचीवाडी अंकुश केंगले, उपाध्यक्ष लक्ष्मण केंगले ,माजी कार्यध्यक्ष किसन गिरंगे, प्रा.अरुण पारधी, सरपंच भोरगिरी विठ्ठल वणघरे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
बृहन्मुंबई पोलिस विभाग अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, 7 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख
..अन्यथा हिरड्याच्या प्रश्नांवर 30 मे पासून बेमुदत आंदोलन, घोडेगाव प्रकल्प कार्यालयात बैठक
10 पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी ! पोस्ट विभाग अंतर्गत मुंबई येथे विविध पदांसाठी भरती
MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठी भरती, 13 जून 2022 शेवटची तारीख