Friday, December 20, 2024
HomeNews२० पेक्षा कमी पट संख्या असलेल्या शाळा बंदीच्या निर्णयाच्या विरोधात SFI ची...

२० पेक्षा कमी पट संख्या असलेल्या शाळा बंदीच्या निर्णयाच्या विरोधात SFI ची शिक्षण ज्योत

पुणे : राज्य सरकारच्या २० पेक्षा कमी पट संख्या असलेल्या शाळा बंदीच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी आणि मुलींची पहिली शाळा स्त्री शिक्षणाचे प्रतिक असलेल्या भिडे वाड्याची झालेली दुर्दशा सुधारून त्याचे राष्ट्रीय स्मारक व्हावे या मागणीसाठी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया(SFI) च्या वतीने शिक्षण ज्योत काढण्यात आली आहे.

अॅड असिम सरोदे यांनी या शिक्षण ज्योतचे उद्घाटन केले. यावेळी अद्विका पोटे या ८ वर्षीय चिमुलीच्या हस्ते ही शिक्षण ज्योत पेटवून या शिक्षण ज्योतला सुरूवात करण्यात आली. यावेळी एसएफआयचे राज्य समिती सदस्य पल्लवी बोराटकर, एसएफआयचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष अक्षय निर्मळ, अभिशेख शिंदे, डीवायएफआयचे नेेते महारूद्र डाके, अर्थतज्ज्ञ अजित अभ्यंकर, सीटूचे वसंत पवार, अंगणवाडी कर्मचारी सेविका संघटनेच्या नेत्या शुभा शमिम, जनवादी महिला संघटनेच्या नेत्या किरण मोघे, झेप फाऊंडेशनचे प्रतिनिधी उपस्थित होते.

ही शिक्षण ज्योत भिडेवाडा ते किल्ले शिवनेरी (शिवजन्मभूमी), जुन्नर अशी १०० किलोमीटर पायी पळत असणार आहे. या शिक्षण ज्योतीमध्ये जवळजवळ ४० ते ५० विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

सर परशुराम महाविद्यालय, गरवारे महाविद्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या ठिकाणी स्थानिक विद्यार्थी व विद्यार्थी संघटनाच्या वतीने या ज्योतीचे जंगी स्वागत करण्यात आले. या सोबतच दापोडी, भोसरी, चाकण, राजगुरूनगर, मंचर, नारायणगाव या ठिकाणी वेगवेगळ्या जनसंघटनाच्या वतीनेही स्वागत करण्यात आले.

ग्रामीण व आदिवासी भागातील समाजाच्या विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी प्राथमिक शाळा स्थानिक पातळीवर सुरू असणे खूप गरजेचे आहे. या गोष्टीकडे पैशांचा अपव्यय न पाहता देशाच्या प्रगतीची भावी गुंतवणूक म्हणून पाहावे असे आवाहन एसएफआयच्या वतीने करण्यात आले. महात्मा फुले, शाहु, आंबेडकरांनी जागवलेला साक्षरतेचा वारसा या पुरोगामी महाराष्ट्रात राज्य सरकारने आबाधित ठेवावा असेही आवाहन एसएफआयच्या वतीने करण्यात आले.

संबंधित लेख

लोकप्रिय