Sunday, December 22, 2024
Homeजिल्हाक्वॉलिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने गुणवत्ता महिना साजरा

क्वॉलिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने गुणवत्ता महिना साजरा

पिंपरी चिंचवड : क्वॉलिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाच्या पुणे चॅप्टरच्या वतीने भोसरी येथील क्वॉलिटी सर्कल फोरमच्या एक्सलेन्स सेंटरमध्ये विविध उद्योग समूहातील गुणवत्ता सुधारणा प्रबंध सादरीकरण, स्लोगन, पोस्टर आणि प्रश्नमंजूषा स्पर्धेत ६० संघांनी सहभाग नोंदविला. 

या स्पर्धेत 15 उद्योग समूहातील १५० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेच्या सकाळच्या सत्राचे उद्घाटन दाना स्पायसर उद्योग समुहाचे डेप्युटी जनरल मॅनेजर (मॅन्युफॅक्चरिंग) विभागाचे किरणकुमार इसे यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. 

यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त आण्णा बोदडे यांनी कोरोना प्रादुर्भावकाळात केलेल्या कार्याबद्दल स्मृतिचिन्ह देवून गौरविण्यात आले. यावेळी फोरमचे अरूण आडीवरकर, विजया रुमाले, अनंत क्षीरसागर आदी उपस्थित होते.

दोन सत्रात झालेल्या स्पर्धेत ओरडविक हाय-टेक प्रा.लि., बडवे अभियांत्रिकी लि.(खालुंबरे), ब्रिजस्टोन इंडिया प्रा.लि., कमिन्स टेक्नॉलॉजीज लि. फलटण, दाना आनंद इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनी लि., मेलक्स कंट्रोल गियर्स प्रा.लि., मिंडा इंडस्ट्रीज लिमिटेड-नियंत्रक विभाग, मिंडा रिनडर प्रा.लि., मदरिका प्रा.लिमिटेड, पुणे, नील मेटल प्रॉडक्ट्स लि., एन.डी.डी.बी. डी.एस. राहुरी, नेक्स्टियर ऑटोमोटिव्ह लि., एसबीईएम प्रा.लि., टाटा ऑटोकॉम्प लि., या स्पर्धेत भाग घेतलेल्या विजेत्यांना फोरमच्या परविन तरफदार, भूपेश मॉल, पवनकुमार रौंदळ, डॉ. संजय लकडे, अनंत क्षीरसागर यांच्या हस्ते पारितोषिके देवून गौरविण्यात आले. दोन्ही सत्रातील मान्यवरांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विजया रूमाले यांनी तर, आयोजन प्रशांत बोराटे व चंद्रशेखर रुमाले यांनी केले.

– क्रांतिकुमार कडुलकर


संबंधित लेख

लोकप्रिय