Friday, September 20, 2024
HomeNewsनवी सांगवी, पिंपळे गुरवमध्यील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा – अण्णा जोगदंड

नवी सांगवी, पिंपळे गुरवमध्यील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा – अण्णा जोगदंड

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : पिंगळे गुरव, नवी सांगवीत सध्या पाच ते दहा गटगटाने मोकाट जनावरे रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून बसलेली आसतात. किंवा बिनधास्त पणे उभी असतात, त्यामध्ये वळू (पोळ) पण असतात.

महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी अंतर्गत सगळीकडे सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम चालू आहे. अधूनमधून पाऊस पडत असल्यामुळे रस्ते निसरडे होतात. नागरिक आपल्या व्यवसायाठी व नोकरीसाठी किंवा दिवाळीच्या खरेदी साठी बाहेर पडत आहेत. नागरिकांना व वाहनांनाही घाबरत नाहीत, नागरिकांनी हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला तर वेळप्रसंगी अंगावर ही धावून येतात. वाहन चालकांना जिव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागते. अशावेळी अपघात होण्याची दाट शक्यता असते.

मोकाट जनावरांचा धोका वाहनचालकांबरोबरच जेष्ठ नागरिक, महीला व लहान मुलांनाही आहे. उभे असलेले मोकाट जनावरे माहेश्वरी चौकातील आहे. असे अनेक ठिकाणी सकाळ संध्याकाळ, मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे आसतात.

यावेळी आण्णा जोगदंड म्हणाले कि, महानगरपालिकेने अशा मोकाट जनावरांच्या तावडीतून नागरीकांची सुटका करावी. पोलिसांनी पण अशा मोकाट जनावरांच्या मालकाला जबाबदार धरावे. बऱ्याच गोठा मालकाकडे चाऱ्याची स़ोय नसल्याने मोकाट जनावरे मोकळे सोडतात. पिंपरी चिंचवड मध्ये बहुतांश गोशाळामध्ये मर्यादेपेक्षा आधिक जनावरे आहेत. पालिकेने, पोलिसांच्या मदतीने मोकाट जनावरांचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीचे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, उपाध्यक्ष विकास शहाणे, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगिता जोगदंड, कार्याध्यक्ष मुरलीधर दळवी व गजानन धाराशिवकर यांनी केली आहे.


Lic
जाहिरात
संबंधित लेख

लोकप्रिय