Tuesday, March 11, 2025

एस. एम. जोशी महाविद्यालयात संत गाडगेबाबा पुण्यतिथी साजरी !

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

हडपसर / प्रा. डॉ. अतुल चौरे : स्वच्छतेचे प्रणेते संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.चंद्रकांत खिलारे यांनी प्रतिमापूजन करून, ग्रामस्वच्छतेचे महत्त्व सांगितले. या दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दत्तक गाव योजनेअंतर्गत मु. पो. पेठ (नायगाव) या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांनी ग्रामस्वच्छता केली.

यावेळी महाविद्यालययातील प्रा.स्वप्नील ढोरे व डॉ.बाळासाहेब माळी यांनी ग्रामस्थांना स्वच्छतेचे प्रणेते संत गाडगेबाबा यांचे सामाजिक कर्तुत्व व कार्याचा दाखला देऊन,  स्वच्छतेचे महत्त्व सांगितले. 

या उपक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.रंजना जाधव, डॉ.दिनकर मुरकुटे, प्रा.ऋषिकेश खोडदे यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रसंगी उपप्राचार्य डॉ.संजय जगताप, ग्रंथपाल डॉ.शोभा कोरडे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.


Related Articles

- Advertisement -

Latest Articles