पिंपरी चिंचवड – महापराक्रमी बुद्धिमान, धैर्य – शौर्य आणि औदार्याचे महान स्फूर्ती स्थान, कठीण परिस्थितीमध्ये स्वराज्याचे रक्षण करणारे, छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेले स्वराज्य ज्यांनी आजरामर केले असे छत्रपती शंभुराजे यांच्या बलिदान दिनाच्या निमित्ताने कामगारांनी शंभुराजेंना मुजरा करत अभिवादन केले. (PCMC)
यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, सिद्धनाथ देशमुख, अनिल बारवकर, जयंत माने, विजय जाधव, तुषार मोरे, अनिल जाधव, विद्या मोरे, अनिता कदम, शिवगंगा वाघमारे, आराध्या कोरे, विजया पाटील, अर्चना कांबळे, शकुंतला धोत्रे आधी उपस्थित होते. (PCMC)
नखाते म्हणाले की छत्रपती शिवरायांच्या पावलावर पाऊल टाकतात शंभूराजेंनी घोडदौड सुरूच ठेवली. राजेंना निर्भीड, पराक्रमी, बुद्धिमान सुपुत्राचा अभिमान वाटत होता .
संभाजीराजांनी सुमारे १० हजार फौज घेऊन गुजरात मोहिमेवर पाठवले असता या युद्धात संभाजीराजांनी मोठा पराक्रम गाजविला आपले सहकाऱ्यांना अत्यंत प्रेमाने तर ज्येष्ठांना सन्मानाने वागवण्याचे काम शंभूराजांनी केले शंभुराजे मराठी प्रमाणे संस्कृत, हिंदी भाषेवर प्रभुत्व मिळविले होते.
PCMC : छत्रपती संभाजी राजे यांना कामगारांकडून मुजरा
- Advertisement -