Tuesday, March 18, 2025

दलित अधिकार आंदोलनाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपद नाशिकच्या महादेव खुडे यांची निवड

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now


कार्यकारिणीत 51 जणांचा समावेश

नाशिक : दलित अधिकार आंदोलनाची राष्ट्रीय पातळीवरील नवी कार्यकारिणी गठित करण्यात आली आहे. 51 जणांच्या टीममध्ये महाराष्ट्रातील चौघांचा समावेश करण्यात आला असून यात नाशिकचे महादेव खुडे यांचा समावेश आहे.

भारतीय खेत मजूर युनियन, महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियन,ऑल इंडिया दलित राईट्स मुव्हमेंट, भारतीय कम्युनिस्ट पक्ष तर्फे औरंगाबाद येथे दोन दिवशीय राष्ट्रीय दलित अधिकार अधिवेशनाचे 18 व 19 डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते.या अधिवेशनाचे उद्घाटन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस काॅम्रेड डी.राजा यांनी केले.तर मार्गदर्शन राष्ट्रीय सचिव मंडळ सदस्य भालचंद्र कानगो यांनी केले.

अधिवेशनासाठी देशभरातून जवळपास 250 प्रतिनिधी उपस्थित होते. दोन दिवस चाललेल्या या अधिवेशनातील विविध सत्रांमध्ये दलितांचे प्रश्न आणि त्याची सोडवणूक यावर सखोल चर्चा झाली. जात, वर्ग आणि पितृसत्ता या विषमता विरोधात केवळ चर्चा नाही, तर कृती कार्यक्रम घेऊन लढण्याचे ठरले. 

51 जणांच्या कार्यकारणीत राज्यातील महादेव खुडे (नाशिक), मधुकर खिल्लारे (औरंगाबाद), फिडेल चव्हाण (बीड) तर नितीशकुमार गणवीर (भंडारा) यांचा समावेश आहे. 

नव्या सचिव मंडळामध्ये अध्यक्ष म्हणून पुदुचेरिचे ए.राममूर्ती, तर महासचिव म्हणून व्ही.एस.निर्मल यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी जानकी पासवान, पी.लिंगम, महादेव खुडे, सचिव एस.राजन, सुस्कारा, सूर्यकांत पास्वान, कोषाध्यक्ष देविकाकुमारी यांची निवड करण्यात आली. 

कॉम्रेड महादेव खुडे नाशिक भाकप चे शहर सचिव भाकपचे आहेत. त्याच्या निवडीचे स्वागत भाकप राज्य सचिव कॉम्रेड राजू देसले, भास्कर शिंदे नाशिक जिल्हा सचिव आदींनी केले आहे. 26 नोव्हेंबर रोजी भाकप वतीने आयतक कामगार केंद्र नाशिक येथे 4 वा. त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.


Related Articles

- Advertisement -

Latest Articles