Thursday, September 19, 2024
Homeजुन्नरलुपीन फाऊंडेशनचा ३४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

लुपीन फाऊंडेशनचा ३४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

जुन्नर : लुपिन फाउंडेशनचा ३४ वा वर्धापन दिन २ ऑक्टोबर रोजी जुन्नर यथे उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमास शबरी आदिवासी महामंडळ जुन्नरच्या शाखा व्यवस्थापक सविता चकवे – डुंबरे, स्त्रीरोग तज्ञ डॉ.भूपेंद्र भगत, लुपिन फाउंडेशनचे वित्त प्रमुख सुनीत नंदवानी, बुचकेवाडीचे उपसरपंच सुरेश गायकवाड, वैष्णवधाम पारुंडे शेतकरी उत्पादक कंपनी बुचकेवाडीचे दगडू पवार, माळ्शेज शेतकरी उत्पादक कंपनी पारगाव तर्फे मढचे अध्यक्ष विनायक चकवे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमास गोद्रे, तळेरान, निमगिरी, खैरे,खटकाळे, राजूर, केवाडी, हडसर, कोटमवाडी येथील २०० शेतकरी व महिला उपस्थित होते. सविता चकवे यांनी लुपिन फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले व शबरी महामंडळाकडे जे प्रकल्प सादर केलेले आहेत त्यांना लवकरच मंजुरी मिळेल याची ग्वाही दिली. लुपिन फाउंडेशन व नाबार्ड पुरस्कृत माळशेज व हाटकेश्वर शेतकरी उत्पादक कंपनी यांचा उत्कृष्ट व्यवसायाबद्दल सन्मान करण्यात आला.

रामदास बुळे यांचा उत्कृष्ट शेळीपालक म्हणून तसेच पंढरीनाथ सरोगदे याचा आदिवासी भागातील उत्कृष्ट ई सेवा चालक म्हणून सन्मान करण्यात आला. तळेरान येथील बचत गटातील महिलांना व्यवसाय निर्मिती साठी धनादेश वाटप करण्यात आले. तसेच जागतिक ह्रदय दिनानिमित्त घेण्यात आलेल्या संगीत खुर्ची व रस्सी खेच स्पर्धेतील विजेत्या महिलाना बक्षीस देण्यात आले.

माळशेज शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालिका शोभाताई मोजाड यांनी लुपिन फाउंडेशन व नाबार्ड यांच्या माध्यमातून माळशेज कंपनीला झालेला व होत असलेल्या फायदा या बद्दल माहिती दिली. रामदास बुळे यांनी लुपिन फाउंडेशनच्या ५ शेळ्याच्या मदती वरून आज १०० शेळ्या पर्यंतचा प्रवास व त्यांना होत असलेला फायदा या बद्दल माहिती दिली. सुरेश गायकवाड यांनी लुपिन फाउंडेशनच्या माध्यमातून बुचकेवाडी गावामध्ये झालेला बदल या बद्दल माहिती सांगितली . सविता घोडे यांनी तळेरान गावामध्ये महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून बचत गटांना झालेला व होत असलेला फायदा या बद्दल माहिती दिली. दगडू पवार यांनी वैष्णवधाम पारुंडे शेतकरी उत्पादक कंपनीच्या यशस्वी वाटचाल या बद्दल माहिती सांगितली. सुनीत नंदवानी यांनी लुपिन फाउंडेशनच्या कार्यबद्दल माहिती दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप झणझणे यांनी केले. निलेश जोंधळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक हिंगे सर यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन लुपिन फाउंडेशनचे प्रकल्प व्यवस्थापक संदीप झणझणे यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्नर तालुका प्रमुख निलेश जोंधळे, संजय धिंदळे, बाळू बोऱ्हाडे, झुंबर साबळे, दुंदा मेणे, सुरेश घोडे, मनीषा बोचरे, पद्मा नेहारकर यांनी केले.

संबंधित लेख

लोकप्रिय